पारोळा : शासनाने ६ वर्ष वय पूर्ण झाल्यानंतरच पाहिलीच्या वर्गात प्रवेश द्यावा, असे परिपत्रक काढले. त्यामुळे थोड्या फरकाने कमी वय असणारी मुले प्रवेशापासून वंचित राहत आहेत. परिणामी पालकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.जे विद्यार्थी साडेपाच अथवा पावणेसहा वर्षांची आहेत ती इयत्ता पाहिलीच्या प्रवेशापासून वंचित राहत आहेत. या निर्णयामुळे हजारो विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहत आहेत. यामुळे पालकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे.ज्या विद्यार्थ्यांचे वय ३० आगस्ट रोजी सहा वर्षे पूर्ण होत असेल त्यांनाच पहिलीत प्रवेश द्यावा, अशा परिपत्रकामुळे साडे पाच ते सहा वर्षे या वयोगटातील अनेक शहरातील शेकडो बालकांचा प्रवेश थांबला आहे. त्यांचे दोन ते तीन महिन्यांसाठी संपूर्ण वर्ष वाया जाणार आहे. यावर शासनाने फेरविचार करावा, अशी मागणी पालक व शिक्षकांकडून होत आहे. पहिली प्रवेशासाठी साडेपाच वर्षे वयोगटाचा निकष लावण्यात यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.शासनाने निर्णय बदलावाशासनाने पहिली प्रवेशासाठी सहा वर्षे वयाचा निकष लावून घेतलेला निर्णय मागे घ्यावा. पाहिलीत प्रवेशासाठी साडेपाच वर्षांची अट असावी.-प्रसाद नावरकर, पालक
शेकडो विद्यार्थी प्रवेशापासून वंचित - पालकांमध्ये तीव्र संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2019 8:16 PM