बांधकाम विभागात वर्दळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:16 AM2021-04-09T04:16:58+5:302021-04-09T04:16:58+5:30
चार डाॅक्टर परतले जळगाव : जळगावात प्रतिनियुक्तीवर रुजू झालेले ९ पैकी चार डॉक्टर विविध कारणांनी परतले. यातील दोघांना कोरोनाची ...
चार डाॅक्टर परतले
जळगाव : जळगावात प्रतिनियुक्तीवर रुजू झालेले ९ पैकी चार डॉक्टर विविध कारणांनी परतले. यातील दोघांना कोरोनाची लागण झाली तर दोघांच्या परिसरात कोविड बाधित आढळून आल्याची माहिती आहे. दरम्यान, ज्या ठिकाणाहून हे डॉक्टर आले होते. तेथेही रुग्णसंख्या व मृत्यूदर वाढल्याने त्यांना परत पाठविण्याची विचारणा स्थानिक प्रशासनाला वारंवार केली जात आहे.
सक्रिय रुग्ण घटले
जळगाव : भुसावळ तालुक्यातील सक्रिय रुग्णांची संख्र्या घटून ९९६ वर आली आहे. काही दिवसांपासून नवे रुग्ण कमी व बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असे चित्र असल्याने ही संख्या घटली आहे. भुसावळात चोपड्याच्या खालोखाल तिसऱ्या क्रमांकाचे रुग्ण आहेत. जळगाव शहरात सध्या सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत.
बाहेरील रुग्ण वाढले
जळगाव : बाहेरील जिल्ह्यातील पण जळगावात उपचार घेणाऱ्या कोरोना रूग्णांची संख्या नियमीत वाढत आहेत. असे ६० सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. बुधवारी असे ५ बाधित आढळून आले हेाते. यात ही संख्या ७३९ वर पोहोचली असून यातील ६७९ रुग्ण बरे झाले आहेत. तर ६० रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.