स्त्रीला समजून घेतले तर खऱ्या अर्थाने स्त्री-पुरुष समानता येईल -सरिता माळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 04:32 PM2019-08-05T16:32:50+5:302019-08-05T16:33:58+5:30

स्री जातीस समजून घेत चार पावलातले दोन पावले पुरुषवर्गही मागे आला तर खºया अर्थाने स्त्री-पुरुष समानता हे तत्त्व प्रभावी ठरेल, असे प्रतिपादन साहस फाउंडेशनच्या संस्थापिका सरिता माळी यांनी व्यक्त केले.

If we understand a woman, there will be real equality between men and women | स्त्रीला समजून घेतले तर खऱ्या अर्थाने स्त्री-पुरुष समानता येईल -सरिता माळी

स्त्रीला समजून घेतले तर खऱ्या अर्थाने स्त्री-पुरुष समानता येईल -सरिता माळी

Next
ठळक मुद्देचाळीसगाव येथे व्याख्यानलाडशाखीय वाणी समाज महिला मंडळाचा उपक्रम

चाळीसगाव, जि.जळगाव : आपले स्वारस्य पणाला लावणारे प्रसंग अन् आव्हानं आजही स्त्रीपुढे पेच घालत असतात. आपल्यातील गगनभरारी, इच्छेला व क्षमतेला तिलाच बांध घालावा लागतो. स्री जातीस समजून घेत चार पावलातले दोन पावले पुरुषवर्गही मागे आला तर खºया अर्थाने स्त्री-पुरुष समानता हे तत्त्व प्रभावी ठरेल, असे प्रतिपादन साहस फाउंडेशनच्या संस्थापिका सरिता माळी यांनी व्यक्त केले.
लाडशाखीय वाणी समाज महिला मंडळाच्या वतीने शहरातील वाणी मंगल कार्यालयात ‘स्त्रीचे नेमके स्थान कोणते?’ या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी लाडशाखीय वाणी समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा माधुरी वाणी, उपाध्यक्षा मीना कुडे, सहसचिव वैशाली येवले, ज्येष्ठ सदस्या वत्सला कोतकर, मालती पाटे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
स्त्री ही निसर्गत:च कोमल स्वभावाची, संवेदनशील मनाची आणि काळजीवाहू असते. त्यामुळेच ती स्वत:हून कौटुंबिक जबाबदाºया जास्त स्वीकारते. यात संस्कार, परंपरा, रुढी यामुळे तिचे विचार स्वातंत्र्य बºयापैकी मर्यादित होत जाते. ती माघार घेणारी असते हे तिच्यातील गुण तिच्यासाठीच मारक ठरतात. संसाराचा गाडा ओढतानाही बºयाचदा तिला नमते घ्यावे लागते. निसर्गाने स्त्रीवरच मातृत्वाची जबाबदारी दिली असल्याने ती अपत्य प्रेमाने आजही बांधली गेली आहे. मुलांचं संगोपन, लालन पालन तन्मयतेने करताना मात्र ती एकटी पडली आहे .स्त्रियांचे पती अन मुलांसाठी मागे राहणे हा त्याग, मोठेपणा राहिला आहे. स्त्रियांच्या या त्यागाला खरोखर मोठे स्थान आहे. पुरुषवर्गाने दोन पाऊले मागे घेऊन तिच्या सोबतीने चालले तरच स्त्री-पुरुष समानता संविधानात अति महत्वाचे तत्त्व खरे होईल अन् समाजाचा सर्वांगीण विकास होईल. एवढेच नाही तर एक संपन्न, विकसित व उन्नत अशी समाजव्यवस्था निर्माण होईल, असे सरिता माळी यांनी सांगितले.
प्रास्ताविक मीना कुडे यांनी केले तर आभार डॉ.चेतना कोतकर यांनी मानले. याप्रसंगी इंदुबाई भोकरे, मालती वरखेडे, कल्पना पाखले, रजनी मोराणकर, सुलभा अमृतकर, कल्पना राणे, अंजली येवले, आशालता पिंगळे, वैशाली अमृतकर, वर्षा शिरुडे, वर्षा पिंगळे, आशालता येवले, मनीषा मालपुरे, डॉ.भाग्यश्री शिनकर, रुचा अमृतकार, संगीता येवले, भारती दुसे आदी महिला उपस्थित होत्या.

Web Title: If we understand a woman, there will be real equality between men and women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.