शहरं
Join us  
Trending Stories
1
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
2
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
3
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
4
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
5
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
6
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
7
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
8
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
9
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
10
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
11
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
12
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट
13
म्हशीमुळे मालकाला भरावा लागला ९ हजार रुपयांचा दंड; असं काय घडलं?
14
तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...
15
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला
16
"तुमचा मित्र हिंदूंना चिरडतोय"; इन्फोसिसच्या माजी सीईओंनी मोहम्मद युनूस यांच्या मित्राला सुनावलं
17
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
18
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
19
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
20
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर

स्त्रीला समजून घेतले तर खऱ्या अर्थाने स्त्री-पुरुष समानता येईल -सरिता माळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2019 4:32 PM

स्री जातीस समजून घेत चार पावलातले दोन पावले पुरुषवर्गही मागे आला तर खºया अर्थाने स्त्री-पुरुष समानता हे तत्त्व प्रभावी ठरेल, असे प्रतिपादन साहस फाउंडेशनच्या संस्थापिका सरिता माळी यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देचाळीसगाव येथे व्याख्यानलाडशाखीय वाणी समाज महिला मंडळाचा उपक्रम

चाळीसगाव, जि.जळगाव : आपले स्वारस्य पणाला लावणारे प्रसंग अन् आव्हानं आजही स्त्रीपुढे पेच घालत असतात. आपल्यातील गगनभरारी, इच्छेला व क्षमतेला तिलाच बांध घालावा लागतो. स्री जातीस समजून घेत चार पावलातले दोन पावले पुरुषवर्गही मागे आला तर खºया अर्थाने स्त्री-पुरुष समानता हे तत्त्व प्रभावी ठरेल, असे प्रतिपादन साहस फाउंडेशनच्या संस्थापिका सरिता माळी यांनी व्यक्त केले.लाडशाखीय वाणी समाज महिला मंडळाच्या वतीने शहरातील वाणी मंगल कार्यालयात ‘स्त्रीचे नेमके स्थान कोणते?’ या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी लाडशाखीय वाणी समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा माधुरी वाणी, उपाध्यक्षा मीना कुडे, सहसचिव वैशाली येवले, ज्येष्ठ सदस्या वत्सला कोतकर, मालती पाटे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.स्त्री ही निसर्गत:च कोमल स्वभावाची, संवेदनशील मनाची आणि काळजीवाहू असते. त्यामुळेच ती स्वत:हून कौटुंबिक जबाबदाºया जास्त स्वीकारते. यात संस्कार, परंपरा, रुढी यामुळे तिचे विचार स्वातंत्र्य बºयापैकी मर्यादित होत जाते. ती माघार घेणारी असते हे तिच्यातील गुण तिच्यासाठीच मारक ठरतात. संसाराचा गाडा ओढतानाही बºयाचदा तिला नमते घ्यावे लागते. निसर्गाने स्त्रीवरच मातृत्वाची जबाबदारी दिली असल्याने ती अपत्य प्रेमाने आजही बांधली गेली आहे. मुलांचं संगोपन, लालन पालन तन्मयतेने करताना मात्र ती एकटी पडली आहे .स्त्रियांचे पती अन मुलांसाठी मागे राहणे हा त्याग, मोठेपणा राहिला आहे. स्त्रियांच्या या त्यागाला खरोखर मोठे स्थान आहे. पुरुषवर्गाने दोन पाऊले मागे घेऊन तिच्या सोबतीने चालले तरच स्त्री-पुरुष समानता संविधानात अति महत्वाचे तत्त्व खरे होईल अन् समाजाचा सर्वांगीण विकास होईल. एवढेच नाही तर एक संपन्न, विकसित व उन्नत अशी समाजव्यवस्था निर्माण होईल, असे सरिता माळी यांनी सांगितले.प्रास्ताविक मीना कुडे यांनी केले तर आभार डॉ.चेतना कोतकर यांनी मानले. याप्रसंगी इंदुबाई भोकरे, मालती वरखेडे, कल्पना पाखले, रजनी मोराणकर, सुलभा अमृतकर, कल्पना राणे, अंजली येवले, आशालता पिंगळे, वैशाली अमृतकर, वर्षा शिरुडे, वर्षा पिंगळे, आशालता येवले, मनीषा मालपुरे, डॉ.भाग्यश्री शिनकर, रुचा अमृतकार, संगीता येवले, भारती दुसे आदी महिला उपस्थित होत्या.

टॅग्स :SocialसामाजिकChalisgaonचाळीसगाव