अमळनेरात गृहमंत्र्यांच्या आगमनापूर्वीच आयजींची मोठी कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2020 11:06 PM2020-10-30T23:06:33+5:302020-10-30T23:07:49+5:30

सव्वा तीन लाखाचा माल जप्त करून ३६ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

IG's big action even before the arrival of the Home Minister | अमळनेरात गृहमंत्र्यांच्या आगमनापूर्वीच आयजींची मोठी कारवाई

अमळनेरात गृहमंत्र्यांच्या आगमनापूर्वीच आयजींची मोठी कारवाई

Next
ठळक मुद्देजुगार अड्ड्यांवर धाडीसव्वा तीन लाखांचा माल जप्त३६ जणांवर गुन्हे दाखल

अमळनेर : महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या आगमनाच्या दोन दिवसांपूर्वीच नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर यांनी विशेष पथक नियुक्त करून शहरात पोलीस कॉलनीच्या शेजारीच सट्टा व मटका जुगारावर मोठी कारवाई करून गृहमंत्र्यांना सलामी दिली आहे. सुमारे सव्वा तीन लाखाचा माल जप्त करून ३६ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस महानिरीक्षकांनी सहायक पोलिस निरीक्षक सचिन जाधव, पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील, राजेंद्र सोनवणे, विश्वेश हजारे, दीपक ठाकूर, सुरेंद्र टोंगरे, अमोल भामरे यांचे पथक तयार केले. मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारावर अमळनेरला पाठवले आणि जुने पोलीस निवासस्थान व बसस्थानक यांच्या मधल्या गांधीनगर नावाच्या गल्लीत संताजी सोडा सेंटर वर छापा टाकला. तेथे अजय चौधरी, विनोद पाटील, विश्वास पाटील, मोहन सैंदाने ,दिनेश चौधरी, नारायण कोळी, शैलेश बाविस्कर, दीपक कोळी, विजय बडगुजर, वसंत कोळी हे सट्टा जुगार खेळताना, आकडे लिहिताना आढळून आल. त्यांच्याजवळून दोन मोटारसायकलींसह ८० हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. तेथूनच अगदी थोड्या अंतरावर हॉटेल सुयश जवळ एक ठिकाणी हिरामण सोनू ठाकरे , राहुल शिंगाणे , बापू भोई ,दत्तात्रय वारुळे , संजय निकम, रमेश अहिरे हेदेखील सट्टा जुगार खेळताना तसेच आकडे लिहिताना आढळून आल. त्यांच्याजवळून एक मोटारसायकल व ६९ हजार ८०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आह. त्याचप्रमाणे याच पथकाने आठवडे बाजारात लालबाग शॉपिंग कॉम्प्लेक्समध्येदेखील छापा टाकला. भूषण चौगुले, संजय सूर्यवंशी, दिवाकर ठाकूर, धनराज कोळी, सुखदेव ठाकूर, मोतीराम कलोसे, जयसिंग वंजारी, आत्माराम बागुल, मुकेश भिल, इब्राहिम मेवती, प्रकाश मोरे, रवींद्र पवार, रवींद्र अहिरे, विनायक पाटील, झाकीर पठाण, श्याम परदेशी, अशोक अहिरे, रामकृष्ण पाटील, मल्हारी कोळी, वासुदेव पाथरवड हेदेखील सट्टा जुगार खेळताना आढळून आले. त्यांच्याजवलील चार मोटारसायकली व जुगाराचे साहित्य असा एकूण एक लाख ६६ हजार ४३० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. एकूण तीन लाख १६ हजार रुपयांचा ऐवज जप्त करून ३६ जणांविरुद्ध जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सर्वाना अटक करण्यात आल. गृहमंत्री येणार असताना भर बाजारात आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाशेजारील गल्लीत मोठ्या प्रमाणावर जुगार अड्डे आढळून आल्याने शहरात जोरदार चर्चा होती

 

Web Title: IG's big action even before the arrival of the Home Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.