तांदलवाडी, ता.रावेर : येथून जवळच असलेल्या बलवाडी येथे सुकी नदी पात्रातील अवैध वाळू उपसा करून वाळूमाफियांनी अनेक ठिकाणी गावात व गावाच्या बाहेर भामलवाडी रस्त्याला लागून अंदाजे चारशे ते पाचशे ब्रास वाळू साठवून ठेवली आहे. अवैध वाळू वाहतुकीस आळा बसण्यासाठी या ठिकाणी प्रशासनातर्फे बैठे पथक वेळोवेळी बसविले जाते, तरीही अवैध वाळू उपसा करून, स्थानिक वाळू माफिया अशी साठेबाजी करून शासनाचा महसूल बुडवितात. या परिसरात कुठेही सुकी नदी पात्रातील वाळूचा ठेका झालेला नाही. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन होणारी अवैध वाळू वाहतूक व साठे यांच्यावर कायदेशीर कारवाई करून, शासनाचा महसूल वाढवावा, अशी परिसरातील सूज्ञ नागरिकांची मागणी आहे.
310821\31jal_1_31082021_12.jpg
बलवाडी येथे साठवलेले वाळूचे अवैध साठे. (छाया- सिद्धार्थ तायडे)