कोरोनाच्या काळात गणेशभक्तांची श्रीगणेशाच्या विसर्जनासाठी धावपळ व गैरसोय होऊ नये यासाठी नगराध्यक्ष करण पवार व मुख्याधिकारी ज्योती भगत यांनी शहरातील गणपती विसर्जनासाठी एकूण ११ गणपती मूर्ती संकलन केंद्रे उभारण्यात आली. त्यात डी.डी.नगर, बोहरा सेंट्रल स्कूल, सानेगुरुजी कॉलनी, कासार गणपती चौक, न.पा. चौक, आझाद चौक, अमळनेर रोड चौफुली, तांबेनगर, गोडबोले गल्ली, कजगाव रोड या ठिकाणी २ मंडप, २ टेबल, खुर्च्या व दोन न.पा. कर्मचारी, होमगार्ड असा बंदोबस्त संकलन केंद्रावर देण्यात आला होता. या सर्व ११ संकलन केंद्रांवर संकलित झालेल्या मूर्ती सजावट केलेल्या ४ ते ५ ट्रॅक्टरच्या द्वारे जमा करून या सर्व मूर्तींचे पूजापाठ करून महावीरनगर येथील तलावात विसर्जन करण्यात आले. या तलावात तराफ्याची व्यवस्था करण्यात आली होती. तराफ्यावर मूर्ती ठेवून मग विसर्जन करण्यात आले. तलावाच्या ठिकाणी बॅरिकेडिंग, होडी लायटिंग, मंडप, पुरोहित या सर्वांची व्यवस्था पालिकेकडून करण्यात आले होते.
गणपती बाप्पाचे विसर्जन शांततेने व्हावे यासाठी लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पवार, उपनगराध्यक्ष दीपक अनुष्ठान, मुख्याधिकारी ज्योती भगत पाटील व सर्व नगरसेवक, नगरसेविका, पोलीस प्रशासन, नगरपालिका कार्यालयीन अधीक्षिका संघमित्रा संदनशिव, अभिषेक काकडे, योगेश तलवारे, पंकज महाजन, संदीप साळुंके, राहुल साळवे, कुणाल सौपुरे, टी.डी. नरवाडे, हिंमत पाटील, किशोर चौधरी, अशोक लोहार, कैलास पाटील, संदीप पाटील यांनी परिश्रम घेतले.