कापसाच्या उद्योगावर ‘कोरोना’चा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 10:13 PM2020-02-14T22:13:49+5:302020-02-14T22:13:54+5:30

निर्यात घटली : जिनिंग उद्योगांना बसला फटका

The impact of 'corona' on the cotton industry | कापसाच्या उद्योगावर ‘कोरोना’चा परिणाम

कापसाच्या उद्योगावर ‘कोरोना’चा परिणाम

Next


गोपाळ व्यास ।
बोदवड : सुमारे महिनाभरा पूर्वीपासून चीनच्या व्ह्यूवान प्रांतात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्याचा परिणाम भारतीय कापूस उद्योगावर झाला आहे. निर्यात घटल्याने या उद्योगात मंदीचे वातावरण आहे.
आखाती देशातील चीन, बांगलादेश, पाकिस्तान, इंडोनेशिया या देशात भारतीय कापसाची निर्यात होत असते. त्यात पाकिस्तान मध्ये कस्टम ड्युटी वाढल्याने निर्यात आधीच घटली आहे , तर कापसाची सर्वात जास्त प्रमाणात निर्यात होणाऱ्या चीन मध्ये आलेल्या कोरोना व्हारस मुळे तेथेही निर्यात घटली आहे. कापसाच्या भारतीय बाजारपेठला आर्थिक फटका बसला आहे. या मंदीचा जिनिंगला फटका सोसावा लागत आहे. त्यामुळे कापसाच्या जिनिंगची धडधड मंदावली असून जिनिंग उद्योगासह या उद्योगावर अवलंबून असलेला मजूरांनाही याचा फटका बसला आहे.
जिनींगची धडधड मंदावली
यातच केंद्र सरकारच्या भारतीय कपास निगम (सीसीआय) ने पाच हजार ५०० दराने कापसाची खरेदी सुरू ठेवली आहे. जिनिंग चालक मात्र पाच हजार १०० चे भाव भरत असल्याने नव्वद टक्के कापूस हा सीसीआय मध्ये जात आहे. परिणामी जिनिंगची धडधड मंदावली आहे. २४ तास चालणारा जिनिंग उद्योग उन्हाळा लागण्यापूर्वीच सात तासांवर आलेला आहे,
जिनींग उद्योग संकटात
याबाबत जय वैष्णवी माता जिनिंगचे संचालक शिरीष जैन यांची प्रतिक्रिया घेतली असता आज घडीला जिनिंग चालवणे कठीण झाले असून निर्यात बंद व ट्रेंड वार चा फटका बसला असल्याने जिनिंग उद्योग संकटात आलेला आहे.
बोदवड तालुक्यात जवळपास अकरा जिनिंग आणि प्रेसिंग आहे त्यात हजारोच्या संख्येने मजूर वर्ग पोट भरत आहे. त्यात काही पर परप्रांतीय मजूर कुटुंबासह आलेले आहेत. गत महिन्याभर पासून चीन मध्ये आलेल्या कोरोना व्हायरस मुळे भारतातून निर्यात होणाºया कापसाच्या गाठाणी बंद झाल्या आहेत.
गठाणीची किंमत दोन हजाराने उतरली
गत महिन्यात सुमारे ४१ हजार २०० रुपयावर असलेली कापसाची एक गाठाणची (एक क्विंटल दहा किलो) किंमत दोन हजारने घटली असून आज एक गाठाणीची किंमत ३९ हजार २०० ेइतकी आहे. तर सरकीला ही त्याचा फटका बसला असून दोन हजार ४०० रुपये असलेली कापसाची सरकी आज घडीला दोन हजार १०० रुपये दराने विकली जात असल्याने त्याचा फटका जिनिग चालकांना सोसावा लागत आहे.

Web Title: The impact of 'corona' on the cotton industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.