मनीष चव्हाणपाल, ता.रावेर, जि.जळगाव : पाल येथून जवळच असलेल्या व सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या गुलाबवाडी या जळगाव जिल्ह्यातील जितेंद्र गवळी या प्राथमिक शिक्षकाच्या कल्पनेतून निर्मित पहिल्या गुलाबी गावाचे थाटात उद्घाटन झाले. वृंदावनधाम पाल आश्रमाचे गादीपती संत श्री गोपाल चैतन्यजी महाराज व आमदार शिरीष चौधरी यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा झाला.यावेळी मान्यवरांनी गावात भ्रमण करून गावातील भिंतीवर लिहिलेल्या बेटी बचाव बेटी पढाव, झाडे लावा झाडे जगवा, स्वच्छता-अभियान, हगणदारी मुक्त गाव पाहून ग्रामस्थांचे कौतुक केले.यावेळी भाजप उपाध्यक्ष पद्माकर महाजन, जि.प.सदस्य प्रतिनिधी अमोल पाटील, पं.स.उपसभापती पी.के.महाजन, माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, तहसीलदार उषाराणी देवगुणे, जि.प.चे माजी सदस्य नंदकिशोर महाजन, स्वामीचे रवींद्र पवार, श्रीराम फाउंडेशनचे सचिव- दीपक नगरे, भाजप तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, कृउबा समिती अध्यक्ष श्रीकांत पाटील, उपाध्यक्ष उस्मान तडवी, रमेश सावळे, सचिन पाटील, ताडजिन्सी येथील सरपंच शबाना तडवी आदी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.
रावेर तालुक्यातील गुलाबी गावाचा उद्घाटन सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 7:37 PM