यावल, जि.जळगाव : वाहनांची वेगमर्यादा आणि नियमांचे काटेकोरपणे पालन करून आपल्या वाहनातील सहप्रवाशी तसेच पादचाऱ्यांची सुरक्षा आबाधित ठेवण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक अरूण धनवडे यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या सुरक्षित वाहतूक सप्ताहानिमित्ताने येथील आगारात एस. टी.कर्मचाऱ्यांना केले.राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने सुरक्षा सप्ताह पाळला जात आहे. त्यानिमित्ताने येथील एसटी आगारात शनिवारी सुरक्षित सप्ताह मोहिमेचे उद्घाटन आगारप्रमुख एस.व्ही. भालेराव यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून पो. नि. घनवडे होते. याप्रसंगी धनवडे यांनी कर्मचाºयांना वाहनाचा वेग मर्यादित ठेवून नियमांचे काटेकोर पालन करण्यासोबत चिंतामुक्त राहण्याचे आवाहन केले.याप्रसंगी आगारप्रमुख शांताराम भालेराव ांनी मार्गदर्शन केले. फौजदार जितेंद्र खैरनार यांनी कर्मचारी बांधवांना सुरक्षित सप्ताहाचे बिल्ले वाटप करण्यात आले. आगाराचे अनिल बाविस्कर, डी.बी. महाजन, खतीब तडवी, एस.व्ही. मोरे, सी.आर. पाटील, एम.आय. तडवी, भालेराव, रमाकांत पाटील, ललित चौधरी, सुरेश चौधरी यांच्यासह आगारातील वाहक, चालक, महिला कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन महाराष्ट्र कामगार संघटनेचे सचिव प्रकाश पी.रावते यांनी केले. आगारातील लिपीक अतुल चौधरी यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेन्द्र पाटील, कैलास पाटील यांच्यासह इतर कर्मचाºयांनी परिश्रम घेतले.
यावल आगारात सुरक्षित वाहतूक सप्ताहाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 8:06 PM
वाहनांची वेगमर्यादा आणि नियमांचे काटेकोरपणे पालन करून आपल्या वाहनातील सहप्रवाशी तसेच पादचाऱ्यांची सुरक्षा आबाधित ठेवण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक अरूण धनवडे यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या सुरक्षित वाहतूक सप्ताहानिमित्ताने येथील आगारात एस. टी.कर्मचाऱ्यांना केले.
ठळक मुद्देवाहतूक नियमांचे पालन कराचिंतामुक्त राहण्याचे आवाहन