पक्षादेशाचे उल्लंघन करणारे यावलचे दोन नगरसेवक अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 09:20 PM2018-10-11T21:20:36+5:302018-10-11T21:23:25+5:30

गटातर्फे काढण्यात आलेल्या व्हीपचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन नगरसेवकांना अपात्र घोषित करण्यात आले आहे. यात एका महिला नगरसेविकेचाही समावेश आहे.

Incompetent two corporators who violate the criteria of the party | पक्षादेशाचे उल्लंघन करणारे यावलचे दोन नगरसेवक अपात्र

पक्षादेशाचे उल्लंघन करणारे यावलचे दोन नगरसेवक अपात्र

Next
ठळक मुद्देजळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी दिला निकालविषय समिती सभापती निवडीच्या वेळी केले होते पक्षादेशाचे उल्लंघन५ फेब्रुवारी रोजी दोन्ही नगरसेवकांविरूद्ध दाखल केला होता अर्ज

यावल, जि.जळगाव : गटातर्फे काढण्यात आलेल्या व्हीपचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन नगरसेवकांना अपात्र घोषित करण्यात आले आहे. यात एका महिला नगरसेविकेचाही समावेश आहे.
शहर विकास आघाडीचे नगरसेवक सुधाकर धनगर व महर्षी व्यास शहर विकास आघाडीच्या नगरसेविका रेखा युवराज चौधरी यांचा यात समावेश आहे.जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी हा आदेश बजावला.
२५ जानेवारी २०१८ रोजी विषय समिती सभापतीपदाच्या निवडीसाठी देवयानी महाजन यांना मतदान करून निवडून आणावे, असा पक्षादेश सुधाकर महाजन यांना बजावण्यात आला होता. मात्र धनगर यांनी व्हिपचे उल्लंघन करत स्वत:च पाणीपुरवठा सभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. शहर विकास आघाडीचे गटनेते अतुल पाटील यांनी हा आदेश काढला होता.
दुसरीकडे सभापती निवडीसाठी रुखमाबाई भालेराव यांना सूचक किंवा अनुमोदक व्हावे असा आदेश महर्षी व्यास शहर विकास आघाडीच्या नगरसेविका रेखा चौधरी यांना बजावण्यात आला होता. गटनेते राकेश कोलते यांनी हा व्हीप बजावला होता. चौधरी यांनीही व्हीपचे उल्लंघन केले.
या दोन्ही नगरसेवकांना अपात्र करण्यात यावे, असा अर्ज पाटील व कोलते यांनी जिल्हाधिकाºयांकडे ५ फेबु्रवारी १८ रोजी दाखल केला होता. त्यावर सुनावणी होऊन दोन्ही नगरसेवकांना अपात्र घोषित करण्यात आले.अर्जदारांच्यावतीने अ‍ॅड.विश्वासराव भोसले यांनी कामकाज पाहिले.

Web Title: Incompetent two corporators who violate the criteria of the party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.