कोरोनामुक्तीच्या वाटेवर असलेल्या बोदवडमध्ये रुग्णवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:21 AM2021-08-14T04:21:51+5:302021-08-14T04:21:51+5:30

लोकमत न्यूज जळगाव : २५ दिवस एकही रुग्ण नसलेल्या बोदवडमध्ये शुक्रवारी अचानक आरटीपीसीआर अहवालामध्ये ५ बाधित रुग्ण आढळून आल्याने ...

Increased morbidity in Bodwad on the way to coronation | कोरोनामुक्तीच्या वाटेवर असलेल्या बोदवडमध्ये रुग्णवाढ

कोरोनामुक्तीच्या वाटेवर असलेल्या बोदवडमध्ये रुग्णवाढ

Next

लोकमत न्यूज

जळगाव : २५ दिवस एकही रुग्ण नसलेल्या बोदवडमध्ये शुक्रवारी अचानक आरटीपीसीआर अहवालामध्ये ५ बाधित रुग्ण आढळून आल्याने सक्रिय रुग्णांची संख्या वाढली आहे. गुरुवारी या ठिकाणी एक बाधित आढळून आला होता. दरम्यान, जिल्ह्यात ८ नवे कोरोनाबाधित समोर आले असून २ रुग्ण बरे झाले आहेत.

जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या वाढून ३३ वर पोहोचली आहे. यात आरटीपीसीआरच्या १३२९ अहवालांमध्ये ६ तर ॲन्टिजनच्या १९५७ तपासणीमध्ये २ बाधित आढळून आले आहेत. शहरात एकही रुग्ण समोर आलेला नाही. शुक्रवारी बोदवड ५, चोपडा २ व भडगाव १ असे रुग्ण आढळून आले आहेत. जळगाव शहर व भुसावळात एक - एक रुग्ण बरा झालेला आहे. सक्रिय रुग्णांमध्ये आता बोदवडमध्येच सर्वाधिक ६ रुग्ण आहेत.

Web Title: Increased morbidity in Bodwad on the way to coronation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.