जीएम फाऊंडेशनच्या लसीकरण महाकुंभात महागर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:17 AM2021-09-19T04:17:48+5:302021-09-19T04:17:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जीएम फाऊंडेशनकडून खान्देश सेंट्रल येथे आयोजित लसीकरण महाकुंभात शनिवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास महागर्दी ...

Inflation in the GM Foundation's Vaccination Mahakumbh | जीएम फाऊंडेशनच्या लसीकरण महाकुंभात महागर्दी

जीएम फाऊंडेशनच्या लसीकरण महाकुंभात महागर्दी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जीएम फाऊंडेशनकडून खान्देश सेंट्रल येथे आयोजित लसीकरण महाकुंभात शनिवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास महागर्दी उसळली होती. त्यात गेटवर नागरिकांना सावरत असताना आमदार सुरेश भोळे हे सुद्धा या गर्दीत दाबले गेले होते. बराच वेळा या गर्दीत व गोंधळात ही मोहीम सुरू होती. अनेक जण गर्दी बघून लस न घेताच परतले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जीएम फाऊंडेशन व भाजपकडून लसीकरणाचा महाकुंभ ही मोहीम राबविली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर दहा हजार लस खान्देश सेंट्रल मॉल येथे उपलब्ध असल्याचे जाहीर करण्यात आले होते. ऑनलाईन स्लॉट उपलब्ध करून देण्यात आला होता. सकाळी ९ वाजेपासून या ठिकाणी नागरिकांची लसीकरणाला येण्यास सुरुवात झाली. ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही माध्यमातून लसीकरण सुरू होते. मात्र, लसीकरण कक्षात जाणारे द्वार अत्यंत छोटे असल्याने या ठिकाणी गर्दी होऊन गोंधळ उडाला होता. धक्काबुक्की व लोटालोटीचे प्रकार या ठिकाणी घडले. लसीकरण मोहिमेला महापौर जयश्री महाजन, आमदार गिरीश महाजन यांनी दुपारी १ वाजता भेट दिली. यासह नगरसेवक भगत बालाणी, दिलीप घुगे, शुचिता हाडा, कैलास सोनवणे, पृथ्वीराज सोनवणे आदींनी भेट दिली. जीएम फाऊंडेशनचे अरविंद देशमुख यांनी नियोजन केले. भाजपच्या कार्यकर्त्यांची मोठी फळी या ठिकाणी कार्यरत होती. नागरिकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली होती. मात्र, नागरिकांनी गेटजवळच प्रचंड गर्दी केली होती. त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

गर्दीत पदाधिकारी सापडले

गेटवर गर्दी झाल्यानंतर आमदार सुरेश भोळे, भाजपचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, अरविंद देशमुख यांनी गर्दी निवारण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे खासदार उन्मेश पाटील हे माईकवरून सर्व लसीकरणाच्या प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करतानाच गर्दी न करण्याचे आवाहन करीत होते. यात हे पदाधिकारीही दबले गेले होते. साधारण तासभर हा गोंधळ सुरू होता.

कोरोनाला कसे हरविणार?

शहरातील सर्वच केंद्रांवर लसीकरण सुरू होते. मात्र, तरीही या ठिकाणी गर्दी उसळली होती. या केंद्रावर सहज लस मिळेल, या अपेक्षेने सर्व जण आल्याने याच केंद्रावर गर्दी उसळल्याचे एक कारण सांगितले जात आहे. शिवाय, सर्व्हर डाऊन असल्यानेही मध्यंतरी गर्दी वाढली होती. ज्या कोरोनाला प्रतिबंध म्हणून ही लस घेतली जात होती. या गर्दीतूनच त्याचा अधिक फैलाव होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Inflation in the GM Foundation's Vaccination Mahakumbh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.