परराज्यातील मृत महिलेच्या अंत्यसंस्कारासाठी घेतला पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 04:14 PM2020-04-07T16:14:22+5:302020-04-07T16:15:24+5:30
अपघातात जखमी झालेले असो किंवा गरीब कुटुंबातील आजाराने जर्जर सदस्य असो केवळ माहिती मिळाली की तत्काळ देव रूपाने समोर उभा राहतो तो म्हणजे शहरातील सागर बडगुजर.
संजय सोनवणे
चोपडा, जि.जळगाव : कोणत्याही प्रकारातून मृत व्यक्तीला उपजिल्हा रुग्णालय अथवा हॉस्पिटलपर्यंत पोचविण्याचे काम असो अथवा अपघातात जखमी झालेले असो किंवा गरीब कुटुंबातील आजाराने जर्जर सदस्य असो केवळ माहिती मिळाली की तत्काळ देव रूपाने समोर उभा राहतो तो म्हणजे शहरातील सागर बडगुजर.
चोपडा शहरात नव्हेतर तालुक्यात खºया अर्थाने सेवाव्रत जोपासणाºया सागर बडगुजर या व्यक्तीने माणुसकीचे दर्शन दाखवून येथील तापी सहकारी सूतगिरणीमध्ये सेवेत असलेल्या परराज्यातील अर्थात ओडिशातील मृत महिलेला उपचारासाठी दाखल करण्यापासून तर स्मशानभूमीपर्यंत अंत्ययात्रा काढेपर्यंत सर्वतोपरी मदत करून माणुसकीचे व देव रूपाचे दर्शन दाखविले. हा तरुण गेल्या अनेक वर्षांपासून ही सेवा जोपासत असल्याने दानशूर व सक्षम लोकांकडून मदत घेऊन सेवेसाठी तत्पर असतो.
तापी सहकारी सूतगिरणीमध्ये ओडिशा येथील ३५ वर्षीय कस्तुरा बुटिका नोकरी करत होती. अचानक तिची तब्येत गेल्या तीन-चार दिवसांपूर्वी बिघडल्याने ती येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आली होती. मात्र काहीही आजार नसल्याचे सांगून परत पाठवले. त्याच वेळेस त्या महिलेच्या अंगात प्रचंड ताप होता. यातच सूतगिरणीचे चेअरमन तथा माजी आमदार कैलास पाटील यांना या महिलेची तब्येत सूतगिरणी क्षेत्रातच बिघडल्याचे समजले. त्यांनी सामाजिक सेवा जोपासणारा व अँम्ब्यूलेन्स सेवा तत्काळ देणारा सागर बडगुजर या तरुणाला भ्रमणध्वनीवरून ही माहिती कळवली. कस्तुरा बुटिका या महिलेस बडगुजर यांनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान तिचे दुसºया-तिसºया दिवशी मृत्यू झाला. इकडे त्या महिलेचा भाऊबंदकी, समाज कोणीच नसल्याने अंतयात्रा कुठून काढायची हा प्रश्न तिच्या पतीच्या मनात निर्माण झाला. त्यावेळेस उपजिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन खोलीपासून तिची अंत्ययात्रा काढावी असे ठरले. यासाठी सागर बडगुजर याने दानशूर व्यक्तींकडून संपर्क करून अंत्ययात्रेसाठी लागणाºया साहित्याची अथवा अँब्यूलन्ससाठी लागणारे डिझेलसाठी उपलब्धी केली आणि त्यातच ही महिला ख्रिश्चन धर्मिय असल्याने तिने मृत्यूआधी माझे शरीर न जाळता मातीत पुरायचे, असे सांगितल्याने काहीवेळ अंत्ययात्रेला उशीर झाला.
अखेर या महिलेचे शव स्मशानभूमीत नेऊन तिथे जाळावे असे ठरले. ही महिला ख्रिश्चन धर्मिय असल्याने कोळसन अण्णा नामक व्यक्तीने फादर आणून ख्रिश्चन धर्मीय विधिवत पद्धतीने तिची अंत्यविधी आटोपला. यासाठी सर्वतोपरी सागरने धडपड करून तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यासोबत वेले येथील ग्रामपंचायत सदस्य दीपक पाटील आणि सामाजिक सेवा जोपासणाºया अमर संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही अंत्यविधीसाठी यथाशक्ती मदत देऊन हा कार्यक्रम पार पडला. त्यासाठी सूतगिरणीमधील मनोहर पाटील, शंकर जैन, अक्षय महांती, रश्मी रंजनदास, राजेश्वर पाटील, सुनील सोनगिर,े अमर संस्थेचे एन.आर.पाटील, चतुर पाटील यांनीही या महिलेच्या अंत्यविधीसाठी मदत केली.