सोने व्यवहाराचीही चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 10:49 AM2019-02-23T10:49:33+5:302019-02-23T10:51:43+5:30
डॉक्टरांना आयकर भवनात बोलावणे
जळगाव : आयकर विभागाच्या अधिकाºयांकडून बुधवारी सुरु झालेली डॉक्टरांचे हॉस्पिटल व घरांची तपासणी सलग तिसºया दिवशीही सुरू होती. संशयास्पद व्यवहारांचे कागदपत्र ताब्यात घेऊन सोने खरेदी व्यवहारांचीही चौकशी या पथकांनी केली.
पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर व मुंबई येथील १०८ आयकर अधिकाºयांच्या पथकाकडून बुधवारी शहरातील आठ बड्या डॉक्टरांचे हॉस्पिटल, पॅथॉलॉजी व त्यांच्या घरी एकाचवेळी धाडसत्र सुरू केले. बुधवारी सकाळी ९ वाजेपासून सुरु झालेली ही तपासणी शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत सुरुच होती.
डाबी हॉस्पिटलमध्ये कसून चौकशी
प्रताप नगरमधील डॉ. राजेश डाबी यांच्या हॉस्पिटलमध्ये खाली हॉस्पिटल व वरती डॉक्टरांचे निवासस्थान आहे. तर हॉस्पिटलला लागून मेडिकल आहे. वरच्या मजल्यावर म्हणजे घरात ६ अधिकारी सलग तिसºया दिवशी तपासणी करत होते तर खाली हॉस्पिटलमध्ये ८ अधिकारी डॉक्टरांकडून माहिती घेत होते. हीच परिस्थिती चिन्मय हॉस्पिटल, नेत्रम, वर्धमान, मधूर हॉस्पिटलमध्येही दिसून आली. काही ठिकाणी सायंकाळी चौकशी आटोपल्याचे सांगण्यात येत होते. त्यांना जळगाव येथील आयकर भवनात पाचारण करून त्यांच्याकडून माहिती घेण्यात येत होती.
काय होतेय तपासणी... या तपासणीत बहुतांश डॉक्टरांचे बॅँक खाते, त्यांचे बँकेत असलेले लॉकर, खरेदी विक्रीचे व्यवहार आदी बाबींची तपासणी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण डॉक्टरांशी या डॉक्टरांचा काही संपर्क आहे काय? त्याचे कट प्रक्टीसचे काही व्यवहार होत आहेत काय? पॅथॉलॉजी, मेडिकल स्टोअरशी असलेले व्यवहार आदी बाबींचीही या कारवाईत अतिशय बारकाईने पथकांकडून तपासणी करण्यात येत आहे. यात काही ठिकाणी संशयास्पद व्यवहार आढळून आल्याने तपासणी सुरूच होती.
कागदपत्रे सिल
विविध हॉस्पिटलमधील तपासणीत कागदपत्रे पडताळणीत संशयास्पद व्यवहार असल्याचे आढळून आल्याने ही कागदपत्रे सिल करण्यात आली आहेत. तसेच काही ठिकाणी सोने खरेदीचे मोठ्या प्रमाणात व्यवहार असल्याचे दिसून आल्याने त्या संदर्भातील कागदपत्रेही सिल करण्यात आल्याचे समजते. सलग तिसºया दिवशी ही तपासणी सुरू असल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.