केंद्र आज ठरणार
जळगाव : शिवाजीनगरातील डी. बी. जैन रुग्णालयात लस दिल्यानंतर काही गंभीर परिणाम उद्भवल्यास रुग्णांना तातडीने हलविणे शक्य होणार नाही. त्या पार्श्वभूमीवर हे केंद्र हलवून घ्यावे, असे आदेश आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी दिले. त्यानुसार सोमवारी शहरातील दोन रुग्णालयांची पाहणी करून हे केंद्र ठरविणार असल्याचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी यांनी सांगितले.
मान्यतेची प्रतीक्षाच
जळगाव : कोरोना काळात ऑक्सिजनच्या पुरवठ्याची अडचण निर्माण होऊ नये म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ऑक्सिजन टँक बसविण्यात आला आहे. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून पेसो समितीची मान्यताच मिळत नसल्याने हे टँक एक शोपीस म्हणून उभे आहेत. येत्या काही दिवसांत ही मान्यता मिळण्याची शक्यता आहे.
भंगार पडूनच
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दोन महिन्यांपूर्वी कक्षात बाहेर काढलेले भंगार हे प्रयोगशाळेच्या बाहेरच पडून आहे. याचा लिलाव कधी होणार हा प्रश्न उपस्थित केला जात असून आचारसंहिता संपल्यानंतर ही लिलाव प्रक्रिया ऑनालइन पद्धतीने पार पडणार असल्याचे समजते.