विवाहात आहेराऐवजी रोपांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 08:50 PM2019-07-14T20:50:55+5:302019-07-14T20:51:03+5:30
वरपित्याने पर्यावरण संरक्षणाचाच दिला संदेश
घुमावल बुद्रूक, ता.चोपडा : तालुक्यातील घुमावल बुद्रूक येथील एका शेतक-याने आपल्या मुलाच्या विवाह समारंभात नातेवाईकांना आहेर देण्याऐवजी वृक्षाची रोपे भेट दिली. या माध्यमातून त्यांनी पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला.
शेतमजूर गुरूदास व्यंकट वाघ यांचे ज्येष्ठ चिरंजीव विक्की याचा सावरखेडा, ता.पारोळा येथील छोटू संभाजी सरदार यांच्या मुलीशी १४ जुलै रोजी चोपडा येथे विवाह पार पडला. पर्यावरणात झाडांचे महत्त्व लक्षात आणून देण्यासाठी, तसेच वृक्षांची लागवड व्हावी यासाठी त्यांनी हा उपक्रम राबविल्याचे सांगितले. विवाहात उपस्थितांना आहेर म्हणून एकूण १००० निंबाच्या झाडांची रोपे भेट दिली. वाघ यांच्या या उपक्रमाचे विधानसभेचे माजी अध्यक्ष अरूणभाई गुजराथी यांच्यासह उपस्थितांनी कौतुक केले.