अमळनेर : शहरातील सुभाष चौक, राणी लक्ष्मीबाई चौक व स्टेट बँकेजवळील हात गाड्यांचे अतिक्रमण पोलीस व नगरपरिषदेच्या संयुक्त विद्यमाने काढण्यात आलेशहरातील काही हातगाड्यांवर सोडाच्या नावाखाली गावठी तसेच देशी दारू विक्री होत असल्याची जनतेची ओरड होती. त्याचप्रमाणे मुख्य रस्त्यांवर टपऱ्या ठेवल्याने अतिक्रमण वाढत जाऊन वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे हे अतिक्रमण काढण्यात यावे अशी मागणी देखील नागरिकांनी केली होती याची दखल घेत मुख्याधिकारी शोभा बाविस्कर व पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी संयुक्तपणे मोहीम राबवून काही प्रमाणात हे अतिक्रमण काढले. सुभाष चौकातील जिल्हापरिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालयाबाहेरील हातगाड्या तसेच , समोरील सिंधी बाजारातील हातगाड्या, स्टेट बँकेजवलील हातगाड्या व टपºया तसेच राणी लक्ष्मीबाई चौकातील टपºया व कच्चे अतिक्रमण हटवल्याने चौकांनी मोकळा श्वास घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी सानेनगर व तलाठी कार्यालयाबाहेरील अतिक्रमण देखील काढण्यात आले.अतिक्रमण हटवण्यासाठी राध्येश्याम अग्रवाल , चंदू बिºहाडे, अविनाश बिºहाडे, सुरेश चव्हाण, राकेश बिºहाडे, यश लोहरे, विशाल सपकाळे, जयदीप गजरे आदींनी सहकार्य केले.
अमळनेरला अतिक्रमणे हटविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2019 10:35 PM