मितावली-पारगाव रस्ता देतोय अपघातास निमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:20 AM2021-08-28T04:20:19+5:302021-08-28T04:20:19+5:30
गेल्या दहा वर्षांपासून मितावली-पारगाव रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून, ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. साइडपट्ट्या खोल होऊन आजूबाजूची झाडेझुडपे ...
गेल्या दहा वर्षांपासून मितावली-पारगाव रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून, ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. साइडपट्ट्या खोल होऊन आजूबाजूची झाडेझुडपे वाढल्याने खड्डे दिसत नाही. धानोरा हे बाजारपेठचे गाव असल्याने नागरिक या रस्ताचा अधिक वापर करतात. वाहनचालकास जाता- येता कसरत करावी लागत आहे. दवाखानासाठी जाताना आजारी व्यक्तीस त्रास सहन करावा लागतो. हा रस्ता दुरुस्त व्हावा यासाठी ग्रामपंचायतीने अनेकदा संबंधित विभागास प्रस्ताव पाठवून, प्रत्यक्ष अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन मागणी मांडली आहे; परंतु आजपर्यंत त्यांचा काही एक फायदा न झाल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे. आता पावसाळ्यात हाल होत असल्याने लोकप्रतिनिधी यांनी लक्ष देऊन रस्ता करावा, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
----
रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ग्रा.पं. ने अनेकवेळा लेखी निवेदन देऊन, अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन समस्या मांडली. मात्र प्रश्न सुटत नाही . -रेखा सुनील पाटील, सरपंचल, ग्रा. पं., मितावली
----
२८/५