फैजपूरच्या धनाजी नाना महाविद्यालयाला आयएसओ मानांकन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 07:16 PM2019-07-14T19:16:14+5:302019-07-14T19:17:17+5:30
फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाने आयएसओ नामांकन ९००१ : २०१५ प्राप्त केले आहे.
फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाने आयएसओ नामांकन ९००१ : २०१५ प्राप्त केले असल्याची माहिती प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी यांनी दिली
आयएसओसाठी आलेल्या समितीने महाविद्यालयाच्या बाबतीत निरीक्षण नोंदविले की, महाविद्यालयात विद्यार्थी केंद्रित विचार आहेत. अभ्यासक्रम निवडीचे भरपूर पर्याय, विविध विषयात करियर ओरिएंटेड कोर्सेसची उपलब्धता, सुसज्ज प्रयोगशाळा, आयसीटीयुक्त वर्ग, अनुभवी प्राध्यापक, शुद्ध पाणी, प्रशस्त क्रीडांगण, ग्राहक भांडार, कॅटीन सुविधा, एनएसएस, एनसीसी, विद्यार्थी कल्याण विभाग, क्रीडा विभाग अशा सोयींनी युक्त महाविद्यालय आहे.
या यशाबद्दल तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष तथा माजी आमदार शिरीष मधुकरराव चौधरी, उपाध्यक्ष प्रा.डॉ.एस.के.चौधरी, उपाध्यक्ष दामोदर हरी पाटील, चेअरमन लीलाधर विश्वनाथ चौधरी, व्हाईस चेअरमन के.आर.चौधरी, सचिव प्रा.एम.टी फिरके, सदस्य मिलिंद वाघुळदे, प्रा.पी.एच.राणे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
प्राचार्य प्रा.डॉ.पी.आर.चौधरी, उपप्राचार्य प्रा.डॉ.अनिल भंगाळे, उपप्राचार्य प्रा.अनिल सरोदे, उपप्राचार्य प्रा.डॉ.उदय जगताप, उपप्राचार्य प्रा.दिलीप तायडे, प्राध्यापक प्रगतीसाठी कसोशीने प्रयत्न करीत आहेत.