भुसावळातील कारागृहाचा प्रश्न मार्गी लावणार : पालकमंत्री गुलाबराव पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 12:42 AM2020-09-07T00:42:51+5:302020-09-07T00:43:42+5:30

भुसावळ येथे दर्जा १ चे जिल्हा कारागृह होण्यासाठी प्रयत्नशील करणार असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

The issue of Bhusawal jail will be resolved: Guardian Minister Gulabrao Patil | भुसावळातील कारागृहाचा प्रश्न मार्गी लावणार : पालकमंत्री गुलाबराव पाटील

भुसावळातील कारागृहाचा प्रश्न मार्गी लावणार : पालकमंत्री गुलाबराव पाटील

Next

जळगाव : येथील जिल्हा कारागृहातील वाढती बंदी संख्या लक्षात घेता भुसावळ येथे दर्जा १ चे जिल्हा कारागृह होण्यासाठी प्रयत्नशील करणार असल्याची माहिती राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
जळगाव जिल्हा कारागृहातून गेल्या महिन्यात कैद्यांनी केलेल्या पलायनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी शुक्रवारी जिल्हा कारागृहास अचानक भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हा कारागृह अधिकारी पी.जे.गायकवाड, वरिष्ठ तुरुंग अधिकारी जितेंद्र माळी उपस्थित होते.
याप्रसंगी माजी महापौर विष्णू भंगाळे, पं.स.सभापती नंदलाल पाटील, रवी चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता सुभाष राऊत, प्रशांत सुरळकर, माळी आदी उपस्थित होते.
२० एकर जागा
भुसावळ येथे २० एकर जागा उपलब्ध असून तेथे जिल्हा कारागृह वर्ग १ नव्याने निर्माण करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. लवकरच भुसावळ येथे हे नवीन कारागृहाच्या मंजुरीसाठी मी स्वत: प्रयत्नशील राहणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

Web Title: The issue of Bhusawal jail will be resolved: Guardian Minister Gulabrao Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.