आरोग्यदायी जीवनशैलीसाठी योग संस्कृती जोपासणे आवश्यक : आदित्य पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:12 AM2021-06-18T04:12:36+5:302021-06-18T04:12:36+5:30
ते कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास विभाग व क्रीडा विभागाच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १७ ...
ते कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास विभाग व क्रीडा विभागाच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १७ ते २१ जून या कालावधीमध्ये ऑनलाइन राष्ट्रीय योग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे, या कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी आयोजित कार्यक्रमात ते बोलत हाेते.
यावेळी धनाजी नाना महाविद्यालयातील क्रीडा संचालक व योगशिक्षक डॉ. गोविंद मारतडे व महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. ए. एल. चौधरी उपस्थित होते.
कार्यशाळेला संबोधित करताना आदित्य पाटील म्हणाले की, योग व प्राणायाम ही भारतीय संस्कृतीला लाभलेली एक मोठी देणगी आहे. दैनंदिन धावपळीच्या व धकाधकीच्या जीवनात योग व प्राणायाम याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. संतुलित उत्तम आहार व दैनंदिन योग साधना मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. योग संस्कृती हीच मानवाला या काळात शारीरिक व मानसिकदृष्ट्या सशक्त ठेवणार आहे.
योगप्रशिक्षक डॉ. गोविंद मारतडे यांनी पाॅवर पॉइंट सादरीकरणाद्वारे योग साधनेचा प्राचीन इतिहास उलगडला. प्रास्ताविक प्रा. डॉ. ए. एल. चौधरी यांनी केले. पाच दिवसीय राष्ट्रीय योग कार्यशाळेत प्रा. डॉ. गोविंद मारतडे, डॉ. ज्योती वाघ, प्राचार्य डॉ. एस. एम. कोटे हे सहभागी सदस्यांना योग व प्राणायाम याविषयी माहिती व प्रशिक्षण देणार आहेत.
दिनांक २१ जून अर्थात आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या दिवशी राष्ट्रीय योग कार्यशाळेचा समारोप होणार आहे. समारोपप्रसंगी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील यांच्यासह औरंगाबाद येथील प्राचार्य डॉ. एस. एम. कोटे उपस्थित राहणार आहेत.
कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ. व्ही. टी. पाटील, डॉ. के. एन. सोनवणे, प्रा. एन. एस. कोल्हे, रजिस्ट्रार डी. एम. पाटील व आयोजन समितीचे सदस्य राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डी. पी. सपकाळे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. शैलेश वाघ, क्रीडा संचालिका क्रांती क्षीरसागर व तांत्रिक विभागप्रमुख डॉ. लालचंद पटले, डॉ. पी. के. लभाणे परिश्रम घेत आहेत.