लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हा फुटबॉल असोसिएशनने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय १७ वर्षाआतील मुले आणि खुल्या गटातील मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत मुलींच्या गटात जैन स्पोर्ट्स अकॅडमी, तर मुलांच्या गटात अॅड.बाहेती महाविद्यालयाने विजय मिळवला. या स्पर्धेचा समारोप रविवारी दुपारी करण्यात आला. अंतिम सामन्यात मुलींच्या गटात जैन स्पोर्ट्स अकॅडमीने स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचा ३-०, तर मुलांच्या बाहेती महाविद्यालयाने जैन स्पोर्ट्स अकॅडमीवर २-० असा विजय मिळवला. पारितोषिक वितरण जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी महावीर बँकेचे अध्यक्ष दलूभाऊ जैन, अनुभूती इंटरनॅशनलच्या संचालिका निशा जैन, नंदलाल गादिया, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, विफाचे माजी खजिनदार मो. आबीद, राष्ट्रीय खेळाडू माधुरी बेहरे, फुटबॉल असोसिएशनचे सचिव फारूक शेख उपस्थित होते. सूत्रसंचालन संघटनेच्या सहसचिव डॉ.अनिता कोल्हे यांनी केले. तर आभार जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी मानले. पंच म्हणून अब्दुल मोहसीन, लियाकत अली सैयद, राहील शेख, चेतन कोळी, अजय वर्चे, कादीर तडवी, ईश्वर मराठे, अरबाज शेख यांनी काम पाहिले. स्पर्धेत अंजली माळी- रायसोनी मराठी शाळा, मेधा पाटील- जैन स्पोर्ट्स अकॅडमी, अभंग जैन- अनुभूती इंटरनॅशनल, अक्षय भोईटे- अॅड.बाहेती महाविद्यालय यांना उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला.
निकाल पुढीलप्रमाणे-मुली - विजयी जैन स्पोर्ट्स अकॅडमी उपविजयी - स्वामी विवेकानंद महाविद्यालय, तृतीय - रायसोनी इंग्लिश स्कूलमुले - विजयी - अॅड.बाहेती महाविद्यालय, उपविजयी - जैन स्पोर्ट्स अकॅडमी, तृतीय - अनुभूती इंटरनॅशनल
वैयक्तिक पारितोषिकेबेस्ट गोलकीपर -गुंजा विश्वकर्मा, जैन स्पोर्ट्स अकॅडमी, विश्वास सिंह, बाहेती महाविद्यालय, बेस्ट डिफेंडर - पूजा नेमाडे, स्वामी विवेकानंद महाविद्यालय, आशुतोष शुक्ला -जैन स्पोर्ट्स अकॅडमी, बेस्ट स्कोअरर नेहा कोळी- जैन स्पोर्टस् अकॅडमी, मुले - फराज खान- जैन स्पोर्टस् अकॅडमी,