जळगाव : कांद्याची आवक दुपटीने वाढल्याने गेल्या आठवड्याच्या तुलनेत कांद्याचे भाव निम्यापेक्षाही कमी होऊन जळगाव कृषी बाजार समितीमध्ये कांदा केवळ २ रुपये प्रती किलोने खरेदी केला जात आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून त्यांच्या डोळ््यात कांद्याने पाणी आणले आहे.आॅक्टोबर महिन्यापासून जळगाव बाजार समितीमध्ये नवीन कांद्याची आवक सुरू झाली आहे. दिवसेंदिवस ही आवक वाढत जाऊन गेल्या महिन्यापासून कांद्याचे भाव सतत कमी होत गेले. नवीन कांद्याची आवक सुरू होताच ३ आॅक्टोबर रोजी कांद्याचे भाव ३०० रुपये प्रती क्विंटलवर आले होते. त्यानंतर मात्र त्या भावांमध्ये थोडी सुधारणा होऊन कांद्याचे भाव ५०० रुपये प्रती किलोवर पोहचले होते. त्यानंतर त्याच्या दुसºया आठवड्यात कांद्याची आवक ७७५ क्विंटलवरून १००० क्विंटलवर पोहचली व कांद्याचे भाव पुन्हा कमी होऊन ते ४७५ रुपये प्रती क्विंटलवर आले.आवक दुप्पट, भाव निम्म्यावर२१ आॅक्टोबर रोजी कांद्याची आवक थेट दुपटीवर पोहचली असून बुधवारी जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २१०० क्विंटल कांद्याची आवक झाली. त्यामुळे कांद्याचे भाव एकदम गडगडले असून ४७५ रुपये प्रती क्विंटलवरून कांदा थेट २०० रुपये रुपये प्रती क्विंटलवर आला आहे. उन्हाळ््यामध्येदेखील एवढे कांद्याचे भाव घसरले नव्हते. मात्र आता आवक प्रचंड सुरू असल्याने भाव घसरत असल्याचे सांगितले जात आहे.उत्पादक हवालदिलमोठ्या कष्टाने कांद्याची लागवड करण्यासह तो काढून बाजार समितीमध्ये आणणे व त्यास मातीमोल भाव मिळणे, यामुळे कांदा उत्पादक मेटाकुटीस आला आहे. बाजार समितीमध्ये कांद्याचा दर्जा पाहून भाव दिला आहे. हा भाव २०० ते ८५० रुपये प्रती क्विंटल असला तरी जास्तीत जास्त कांदा २०० रुपये प्रती क्विंटलने खरेदी केला जात असल्याने कांदा उत्पादकांच्या डोळ््यात पुन्हा ‘पाणी’ येत आहे.ग्राहकांना दिलासा नाहीचकांद्याचे भाव गडगडले असले तरी त्याचा ग्राहकांना फायदा नसल्याचे चित्र किरकोळ बाजारात आहे. एकतर कमी भाव मिळत असल्याने उत्पादक हवालदिल झाले तर या कमी भावाचा फायदा ग्राहकांना होत नाही. किरकोळ बाजारात कांदा अजूनही १० रुपये प्रति किलोनेच विक्री होत आहे.शेजारील जिल्ह्यातून आवक वाढलीजळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यासह धुळे जिल्हा तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड भागातून कांद्याची आवक सुरू आहे. त्या भागांमध्ये कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात असल्याने तेथून ही आवक वाढली असल्याचे सांगितले जात आहे. जिल्ह्यात चाळीसगाव तसेच चोपडा तालुक्यातील अडावद व परिसर तसेच यावल तालुक्यातील किनगाव व परिसरात कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र हा कांदा त्या-त्या बाजार समिती व उप बाजात समितीमध्ये विक्री होत असून तेथेही कांद्याचे भाव गडगडले असल्याचे सांगण्यात आले.कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने कांद्याचे भाव कमी झाले आहे. गेल्या महिन्यापासून नवीन कांद्याची आवक सुरू झाली. त्यामुळे भाव कमी होत आहेत.- वासू पाटील, विभाग प्रमुख, फळे व भाजीपाला विभाग, कृषी उत्पन्न बाजार समिती, जळगाव.
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा दोन रुपये किलो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 11:50 AM
शेतकऱ्यांच्या डोळ््यात ‘पाणी’
ठळक मुद्देकिरकोळ बाजारात मात्र १० रुपये किलोने विक्रीशेजारील जिल्ह्यातून आवक वाढली