जळगाव शहरात वाळूच्या डंपरन वृद्धाला उडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 03:43 PM2018-05-07T15:43:28+5:302018-05-07T15:43:28+5:30
शिवाजी नगरात जिल्हा दूध संघानजीक वाळूच्या डंपरच्या धडकेने केटरींग कारागीराचा हात निकामी झाल्याच्या घटनेला दोन दिवस उलटत नाही तोच सोमवारी पुन्हा वाळूच्या डंपरने गोपाळपु-यातील एका वृद्धाला उडविल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली.
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,७ : शिवाजी नगरात जिल्हा दूध संघानजीक वाळूच्या डंपरच्या धडकेने केटरींग कारागीराचा हात निकामी झाल्याच्या घटनेला दोन दिवस उलटत नाही तोच सोमवारी पुन्हा वाळूच्या डंपरने गोपाळपु-यातील एका वृद्धाला उडविल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली.
रामदास झिपा भील (वय ७० रा.गोपाळपुरा, जळगाव) यांच्या पायावरुन डंपर गेल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर संतप्त जमावाने डंपरवर दगडफेक करीत चालकाला मारहाण केली.सकाळी दहा वाजता मनपाच्याचौबे शाळेजवळहीघटनाघडली.
पायावरुन गेले डंपर
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, रामदास भील हे चौबे शाळेकडून बळीराम पेठकडे रस्ता ओलांडत असताना खेडी येथून वाळू घेऊन येत असलेल्या डंपरने (क्र.एम.एच.१९ बी.जी.२३१३) त्यांना धडक दिली. त्यात ते जमिनीवर कोसळले व त्याच वेळी डंपरचे पुढचे टायर रामदास भील यांच्या पायावरुन गेले. जागेवरच रक्तबंबाळ झालेल्या रामदास भील यांना नागरिकांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. शनी पेठ पोलिसांनी डंपर ताब्यात घेवून ते जिल्हा पेठ पोलीस स्टेशनच्या आवारात लावले तर चालक स्वप्नील धनगर हा नंतर पोलीस ठाण्यात दाखल झाला.