आॅनलाईन लोकमतजळगाव दि,७ : बांधकाम सुरु असलेल्या इमारतीवरुन पडल्याने इकबाल फकीरोद्दीन पिंजारी (वय ३८, रा.खंडेराव नगर, जळगाव) या मजुराचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी साडे नऊ वाजता शिवाजी नगरातील बरकते मशिदीजवळ असलेल्या चिश्तिया पार्क येथे घडली.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, बांधकाम ठेकेदार अय्युब पिंजारी यांनी चिश्तिया पार्क येथे एका घराचे बांधकाम घेतले आहे. त्या ठिकाणी दहा ते बारा मजूर काम करतात. नेहमीप्रमाणे सर्व मजुर साडे आठ वाजताच कामाला आले. इकबाल पिंजारी हे पहिल्याच मजल्यावर कॉलमवर पार्टेशन लावण्याच्या कामाची तयारी करीत असताना उभे राहण्याच्या पाटीवरुन पाय घसरल्याने ते खाली कोसळले. हा प्रकार लक्षात येताच अन्य मजुरांनी त्यांच्याकडे धाव घेतली. डोक्याला जबर मार लागल्याने रक्तस्त्राव होत असल्याने त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.सर्वच मजूर नातेवाईकअय्युब पिंजारी या ठेकेदाराकडे असलेले सर्वच मजूर एकमेकाचे व पिंजारी यांचे नातवाईक आहेत. इकबाल पिंजारी यांचे ते माम सासरे होते. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच जिल्हा रुग्णालयात कुटुंब व नातेवाईकांनी धाव घेतली. अतिशय मनमिळावू व स्वभावाने प्रेमळ असलेल्या इकबालच्या मृत्यूचा अनेकांना धक्का बसला. दोन जणांची तर शुध्दच हरपली होती. ठेकेदार पिंजारी हे देखील बेशुध्द पडले होते. नातेवाईकांचा होणारा आक्रोश उपस्थितांचे मन हेलावणारा होता. इकबाल यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले व आई, वडील असा परिवार आहे.
जळगाव शहरात बांधकाम सुरु असलेल्या इमारतीवरुन पडून मजुराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2018 3:51 PM
बांधकाम सुरु असलेल्या इमारतीवरुन पडल्याने इकबाल फकीरोद्दीन पिंजारी (वय ३८, रा.खंडेराव नगर, जळगाव) या मजुराचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी साडे नऊ वाजता शिवाजी नगरातील बरकते मशिदीजवळ असलेल्या चिश्तिया पार्क येथे घडली.
ठळक मुद्दे शिवाजी नगरातील घटना जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांचा प्रचंड आक्रोशपाटीवरुन पाय घसरला