लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - कोरोनामुळे मृत झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जळगाव शहरातील नेरी नाका स्मशानभूमीत १५०० रुपये द्यावे लागत आहेत. विशेष म्हणजे या ठिकाणी लाकडांची कमतरता असल्याने हे पैसे घेतले जात आहेत. मात्र रविवारी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ याकडून महापालिकेला लाकडांचा साठा मिळाला असल्याने अनेक रुग्णांवर आता मोफत अंत्यसंस्कार देखील केले जाणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मध्यंतरी देखील महापालिकेकडे लाकडांचा साठा मुबलक असल्याने काही अंत्यसंस्कार हे मोफतच केले जात होते. तसेच नेरी नाका स्मशानभूमीत गॅस दाहिनी बसवण्यात आली असली तरी या ठिकाणी देखील १५०० रुपये आकारले जातात.
अंत्यसंस्कार सेवा - १५०० रुपये
एकूण स्मशानभूमी - ४
कोरोना रुग्णांसाठी राखीव - १
महिन्याला अंत्यसंस्कार - २७८
महापालिकेच्या वार्षिक खर्च - ५० लाख