जळगाव जिल्ह्यात बळीराजाचा गेला पुन्हा एकदा ‘बळी’

By ram.jadhav | Published: February 11, 2018 06:39 PM2018-02-11T18:39:33+5:302018-02-11T18:44:16+5:30

रब्बीचा हंगाम झोपला : गारपीट व अवकाळी पावसाचा तडाखा 

Jalgaon district farmers again lost their winter season crop | जळगाव जिल्ह्यात बळीराजाचा गेला पुन्हा एकदा ‘बळी’

जळगाव जिल्ह्यात बळीराजाचा गेला पुन्हा एकदा ‘बळी’

Next
ठळक मुद्देगहू, हरभºयासह केळीला फटका़पुन्हा दोन दिवस अवकाळीचा अंदाज़ सोमवारपासून पंचनामे करण्याचे कृषी विभागाचे आदेश़

जळगाव/वाकोद, फत्तेपूर, जामनेर : जिल्ह्यातील जामनेर, गाढोदा, भोकर, किनोद, कठोदा परिसरात रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास १५ मिनीटे पावसासह गारपीट झाली. तर जामनेर तालुक्यात फत्तेपूर आणि वाकोद परिसरात दुपारी २ वाजेच्या सुमारास गारपीट होवून मोठे नुकसान झाले़ 
 अवकाळीमुळे गहू, हरभरा या पिकांसह केळीला देखील फटका बसला आहे. या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश कृषी विभागाने दिल्याने सोमवारपासून पंचनामे करण्यात येणार असल्याची माहिती कृषी अधीक्षक विवेक सोनवणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. 
जळगावात १० मिनिटे कोसळल्या पावसाच्या सरी
रविवारी जळगाव शहर व परिसरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. सकाळी ८ वाजता शहरातील काही भागात पावसाचा शिडकावा झाला, त्यानंतर सकाळी १०.४५ वाजता शहरात १० मिनिटे पावसाच्या सरी कोसळल्या, त्यामुळे एकच धांदल उडाली. संडे बाजारासह बहिणाबाई महोत्सवातील स्टॉलवर या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली होती.

जोरदार वाºयासह गारपीट
जळगाव तालुक्यातील गिरणा व तापी नदीच्या पट्ट्यातील  आव्हाणे, कानळदा, वडनगरी, नांद्रा या गावांमध्ये दहा ते पंधरा मिनीटे पाऊस झाला. तर गाढोदा, किनोद, भोकर व कठोरा परिसरात वाºयासह गारपीट देखील झाली. त्यात गहू, हरभरा पिकाचे नुकसान झाले असून, केळीच्या कांदेबागाला देखील फटका बसला आहे. कठोरा भागात अनेक ठिकाणी केळीचे खांब वाºयामुळे कोसळले होते. हाताशी आलेला रब्बीच्या हंगामाला फटका बसत असल्याने  शेतकरी हतबल झाले आहेत.

जोरदार वाºयासह गारपीट
जळगाव तालुक्यातील गिरणा व तापी नदीच्या पट्ट्यातील  आव्हाणे, कानळदा, वडनगरी, नांद्रा या गावांमध्ये दहा ते पंधरा मिनीटे पाऊस झाला. तर गाढोदा, किनोद, भोकर व कठोरा परिसरात वाºयासह गारपीट देखील झाली.  
 
गव्हाचा दाणा बारीक पडण्याची तर हरभरा फुगण्याची भीती
गारपीट व पावसामुळे रब्बीच्या हरभरा व गहू या पिकाला सर्वाधिक फटका बसल्याचा अंदाज आहे. अनेक ठिकाणी गहू व हरभरा कापणीवर आला आहे. त्यातच रविवारी अचानक पावसाने हजेरी लावल्यामुळे गव्हाचा दाणा बारीक पडण्याची भिती आहे. हरभरा देखील पावसामुळे फुगल्यास गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच ढगाळ वातावरण कायम राहिल्यास किडींचा व बुरशीचादेखील प्रादुर्भाव होण्याचा अंदाज जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी मधुकर चौधरी यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केला. 

काय आहे पावासाचे कारण?
ओडीसा व पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये चक्रवाती वाºयांचे क्षेत्र तयार झाले असून, बंगालच्या उपसागराकडून छत्तीसगड, झारखंड, महाराष्टÑ व मध्यप्रदेश भागाकडे वारे वाहत आहेत. त्याचवेळी उत्तर व पूर्वेकडून देखील थंड वारे वाहत आहेत. या तिन्ही भागांकडून येत असलेले वारे एकत्रित आल्याने पावसाची स्थिती निर्माण करतील अशा ढगांची निर्मिती झाली आहे. 
वाकोदसह परिसरात जोरदार 

वाकोदसह परिसरात अवकाळी पाऊस आणि गारपीट
 वाकोदसह परिसरात रविवार ११ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास अवकाळी पावसाला सुरुवात झाली़ वाकोदमध्ये काही वेळ गहुच्या आकाराची गार पडली़ तर येथून जवळच असलेल्या वडाळी परिसरात जोरदार गारपीट झाली़ यामध्ये रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे़ कांदा, फरदडचा कापूस, दादर, गहु, मका, केळी, ऊस, हरभरा, करडई, बाजरी भाजीपाला अशा सर्व प्रकारच्या रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे़ वडाळी परिसरातील शेतामध्ये अक्षरश: गारांचा सडा पडला होता़ गारपीटीमुळे शेतात उभे असलेले पिक जमीनदोस्त झाले़ परिसरात जवळपास २० ते २५ मिनीटे सारखी गारपीट झाली़ यामुळे शेतशिवारात मोठे नुकसान झाले आहे़  

 दुष्काळात तेरावा महीना :
 खरीप हंगामात पावसाच्या लहरीपणामुळे अपेक्षित उत्पन्न शेतकºयांना मिळाले नाही़ परतीच्या पावसाने रब्बीच्या पिकांच्या अपेक्षा असताना आता आचनक झालेल्या अवकाळी पावसाने व गारपीटीने हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे़ त्यामुळे शेतकरी वर्ग पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे़  
फत्तेपूर परिसरात वादळी वाºयासह गारांचा वर्षाव

गेल्या दोन दिवसापासून अभ्राच्छादित वातावरण असल्यामुळे शेतकºयांचा जीव टांगणीला होता़ त्यातच शेवटी रविवारी दुपारी  २ वाजेच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह व तुफान वादळासह बोराच्या आकाराच्या व लिंबाच्या आकाराएवढ्या गारांचा वर्षाव सर्वत्र झाला. 
फत्तेपूरसह टाकळी पिंप्री, चिंचोली पिंप्री, कसबा पिंप्री, गोद्री, किन्ही, शेवगा, मेहेगाव, निमखेडी, लोणी, मादणी, पिंपळगाव असा परिसर गारपिटचा बळी ठरलेला आहे. हा एवढ्या मोठ्या गारांचा वर्षाव १५ मिनिटापर्यंत सुरुच होता. त्यामुळे तोंडाशी आलेला गहू, हरबरा भुईसपाट झाला़ केळीची पाने फाटून कापणीस आलेल्या केळीच्या पिकाचे अतोनात नुकसान झालेले आहे. आधीच कापसाच्या पिकावरील बोंड अळीच्या प्रादूर्भावाने शेतकरी नागवला गेला आहे. त्यामुळे बहुतांशी शेतकºयांनी कपाशी उपटून गहू, हरबरा पेरला होता. मात्र हातातोंडाशी येऊ घातलेले तेही उत्पन्न या अस्मानी संकटाने हिरावून घेतल्याची स्थिती निर्माण झाली आहे. खरीपाच्या उत्पन्नासह रबीचा हंगामही हातचा जाता झाला. त्यामुळे बळीराजा हा आर्थिक आणि मानसिक दृष्ट्या पार खचून गेलेला आहे. देवाने दूर लोटले, व्यापाºयाने लुटले व सरकारने डोळे झाकले अशा त्रिकोणात बळीराजा गुरफुटला आहे़ 
भडगाव शहरासह तालुक्यातील अनेक गावांत पावसाचा शिडकावा झाला. दिवसभर आभ्राच्छादीत वातावरण होते. यामुळे रब्बीच्या पिकांना नुकसान आणि आंब्याच्या झाडावरील मोहर गळण्याची भीती शेतकºयांनी व्यक्त केली आहे.
चाळीसगाव आणि पाचोरा तालुक्यात दिवसभर ढगाळ वातावरण होते. 


जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिले पंचनामे करण्याचे आदेश
जामनेर तालुक्यातील फत्तेपूर, तोंडापूर व मांडवे खुर्द परिसरात रविवारी दुपारी अवकाळी पाउस व गारपीट झाल्याने मका, गहू, कांदा, केळी आदी पिकांचे नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेला रब्बीचा हंगाम वाया गेला आहे़
 औरंगाबादहून  जामनेरकडे येत असतांना जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना काही शेतकरºयांनी रस्त्यात उभे करून झालेल्या नुकसानीची माहिती दिली़ त्यावेळी तात्काळ त्यांनी त्या भागांना भेट देऊन पाहणी केली यात मांडवे, खांडवा, रांजणी, तोडापूर परिसरात जावून पाहणी केली. यावेळी महाजन यांनी कृषी व महसूल विभागाच्या अधिकार्यांना नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून शेतकºयांना मदत करण्याच्या सूचना दिल्या. 

अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याची माहिती मिळाल्याने शेतकºयांसोबत जावून पाहणी केली व अधिकाºयांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे़ नुकसानग्रस्तांना तातडीने शासनाकडुन मदत देण्यात येईल.
                  गिरीष महाजन, जलसंपदा मंत्री.

http://www.lokmat.com/amravati/heavy-hail-storm-anjangaon-surji-amravati-district/

Web Title: Jalgaon district farmers again lost their winter season crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.