जळगाव जिल्हा रुग्णालयात अधिष्ठातांना साडी, चोळी व बांगड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 12:45 PM2018-07-10T12:45:35+5:302018-07-10T12:45:50+5:30
भारिप बहुजन महासंघाच्यावतीने आंदोलन
जळगाव : जिल्हा रुग्णालयातील (वैद्यकीय महाविद्यालय) गैरसोयींबद्दल केलेल्या तक्रारीची दखल न घेतल्याने सोमवारी दुपारी भारिप बहुजन महासंघाच्यावतीने अधिष्ठाता डॉ. बी.एस. खैरे यांना साडी, चोळी, बांगड्या देऊन आंदोलन करण्यात आले.
वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण पाटील व वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश खेताडे यांनी रुग्णांना बाहेरुन सोनोग्राफी करण्यासह एक्स-रे करण्यास सांगितले होते. त्याबाबत पुराव्यासह २२ जून रोजी अधिष्ठाता डॉ. खैरे यांना महासंघाच्यावतीने निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली. तरीदेखील कारवाई न झाल्याने व त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करीत महासंघाच्यावतीने सोमवारी हे आंदोलन करण्यात आले.
या वेळी गमीर शेख, प्रमोद इंगळे, किरण नन्नवरे, भिमराव सोनवणे, मछिंद्र सोनवणे, भरत ससाणे, नितीन सोनवणे, वाल्मीक सपकाळे, मनोज इंगळे, जावेद शेख, गौतम सोनवणे, जे.डी. भालेराव, सलाउद्दीन शेख, जुनेद अख्तर, हर्षल सोनवणे, सिद्धार्थ बिºहाडे आदी उपस्थित होते.