- विलास बारीजळगाव - नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे ‘उठी उठी गोपाळा, घनश्याम सुंदरा, ओम नमोजी आद्या’ या भूपाळीचे स्वर भाऊंच्या उद्यानात सर्वदूर पसरले आणि वातावरण चैतन्यमय झाले. तसेच ‘तीर्थ विठ्ठल, सुखाचे जे सुख, अवघे गरजे पंढरपूर, बाजे रे मुरली या बाजे, आज जाने की जिद, रात ऐसी गोठली’ या गझलचे सादरीकरण व ‘तू माने या ना माने, दमा दम मस्त कलंदर’ या सुफी परंपरेतील गीतांनी रसिक मंत्रमुग्ध झाले.
भाऊंच्या उद्यानात परिवर्तनच्या कलावंतांनी दिवाळी पहाटचं स्वागत तालासुरांनी स्वरांनी केलं. शास्त्रीय संगीतातील बंदीश, अभंग, गझल, सुफी, इंग्रजी, अहिराणी, राजस्थानी लोकगीतांच्या माध्यमातून दिवाळी पहाट हा कार्यक्रम रंगला. कार्यक्रमात साथसंगत भूषण गुरव, गौरव काळंगे, रोहित बोरसे, सुनील पाटील, अनुज पाटील यांनी केले. हर्षल पाटील यांनी निवेदन केले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नितीन इंगळे, विद्यापीठाचे कुलसचिव विनोद पाटील, किरण बच्छाव, अनिल कांकरिया यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे दिग्दर्शन मंजुषा भिडे, संकल्पना भूषण गुरव, निर्मिती प्रमुख नारायण बाविस्कर, विनोद पाटील, सूत्रधार होरीलसिंग राजपूत व मंगेश कुलकर्णी हे होते.