विजयकुमार सैतवालजळगाव : जळगाव महानगरपालिका निवडणुकीत विद्यामान दिग्गज नगरसेवकांना पराभवाचा धक्का बसला आहे.मावळत्या पालिकेतील भाजपाचे नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांना या निवडणुकीत भाजपाने तिकीट नाकारल्याने त्यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढविली. मात्र अभ्यासू नगरसेवक अशी ओळख असलेल्या सोनवणे यांचा या निवडणुकीत पराभव झाला. या सोबतच पिंप्राळा या उपनगर भागातील प्रतिनिधीत्व करणारे अमर जैन यांनाही पराभवाचे तोंड पहावे लागले आहे. विशेष म्हणजे भाजपाने मोठा विजय मिळविला असला तरी मावळत्या महापालिकेतील भाजपाचे गटनेते सुनील माळी हेच या निवडणुकीत पराभूत झाले आहेत. या सोबतच आश्विनी देशमुख, जयश्री धांडे, शिवचरण ढंढोरे, सुनील माळी, खुबचंद साहित्या हेदेखील पराभूत झाले आहेत.प्रमुख विजयी उमेदवारललित कोल्हे (भाजपा), सिंधूताई कोल्हे (भाजपा), लता सोनवणे (शिवसेना), जिजाबाई भापसे (ािश् नवनाथ दारकुंडे (भाजपा) , भारती सोनवणे (भाजपा), नितीन लढ्ढा (शिवसेना), विष्णु भंगाळे (शिवसेना), ज्योती तायडे (शिवसेना), राखी सोनवणे (शिवसेना), सुनील महाजन (शिवसेना), जयश्री महाजन (शिवसेना),सदाशिव ढेकळे (भाजपा), लता भोईटे (भाजपा), सीमा भोळे (भाजपा), डॉ.आश्विन सोनवणे (भाजपा), शुचिता हाडा (भाजपा) , मनोज चौधरी (शिवसेना), भगत बालाणी (भाजपा), उज्वला बेंडाळे (भाजपा), ज्योती चव्हाण (भाजपा), नितीन बरडे (शिवसेना), अनंत जोशी (शिवसेना) , इबा पटेल (शिवसेना).प्रमुख पराभूत उमेदवारसंगीता दांडेकर (शिवसेना), ममता कोल्हे (शिवसेना), शिवचरण ढंढोरे (शिवसेना) सुनील माळी (भाजपा), जयश्री धांडे (शिवसेना), वर्षा खडके (शिवसेना), जयश्री पाटील (अपक्ष), अमर जैन (शिवसेना), दिपाली पाटील (राष्टÑवादी कॉँग्रेस), लिना पवार (अपक्ष) पृथ्वीराज सोनवणे (शिवसेना), अशोक लाडवंजारी (भाजपा), श्यामकांत सोनवणे (शिवसेना) आश्विनी देशमुख (राष्टÑवादी), चेतन शिरसाळे (शिवसेना), अनिल देशमुख (भाजपा), हेमलता नाईक (शिवसेना), खुबचंद साहित्या (शिवसेना).
Jalgaon Election Results : भाजपाचा विजय, मात्र गटनेताच पराभूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 3:50 PM