जळगावच्या महिला डॉक्टरची पिंपरी-चिंचवडमध्ये आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:13 AM2021-07-15T04:13:51+5:302021-07-15T04:13:51+5:30

सासरच्यांवर गुन्हा दाखल : १२ व्या मजल्यावरून घेतली उडी लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : सासरच्यांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून जळगाव ...

Jalgaon female doctor commits suicide in Pimpri-Chinchwad | जळगावच्या महिला डॉक्टरची पिंपरी-चिंचवडमध्ये आत्महत्या

जळगावच्या महिला डॉक्टरची पिंपरी-चिंचवडमध्ये आत्महत्या

Next

सासरच्यांवर गुन्हा दाखल : १२ व्या मजल्यावरून घेतली उडी

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : सासरच्यांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून जळगाव येथील माहेर असलेल्या डॉ. किरण संदीप पाटील (वय ३४, रा.विद्यानगर, जळगाव) या विवाहितेने पिंपरी-चिंचवडमधील पुनावळे येथे बाराव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना ७ जुलै रोजी घडली. याप्रकरणी मंगळवारी पतीसह सासरच्या चार जणांच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. किरण यांचे पती आयटी इंजिनिअर असून, मालमत्तेचा हक्क सोडावा व घटस्फोट द्यावा या कारणावरून डॉ. किरण यांचा पुनावळे येथे २०११ ते ७ जुलै २०२१ या कालावधीत सतत छळ झाला. डॉ. किरण यांनी माहेरी या घटनेची माहिती दिली होती. ७ जुलै रोजी पती, सासरच्यांनी जबरदस्तीने तिच्याकडून चिठ्ठी लिहून घेतली. आत्महत्येस कोणाला जबाबदार धरू नये असे त्यात लिहिले आहे; पण हे अक्षर तिचे नाही व सहीदेखील तिची नाही, असे डॉ. किरण यांच्या आई विमल शिरीष लोखंडे यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.

त्यानुसार विवाहितेचा पती संदीप कांतीलाल पाटील (वय ४०), सासरे कांतीलाल झावरू पाटील (वय ५६), कमल कांतीलाल पाटील ( रा. पुनावळे, पिंपरी-चिंचवड, मूळ रा. साळवा, ता. धरणगाव) आणि नणंद मनीषा यशवंत पाटील ( अयोध्यानगर, जळगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या मुलीला तिच्या वर्णावरून आरोपींनी वारंवार हिणवले. तसेच भागीदारीमध्ये घेतलेल्या घराच्या हक्क सोडपत्रावर सही करण्यास आणि जबरदस्तीने घटस्फोट देण्यासाठी मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून फिर्यादी यांच्या विवाहित मुलीने आत्महत्या केली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

Web Title: Jalgaon female doctor commits suicide in Pimpri-Chinchwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.