जळगाव : प्रभाग १६ ड मधून माघार घेण्यासाठी एका उमेदवारांने आपल्यावर दबाव टाकल्याने उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागला, अशी तक्रार माजी नगरसेवक अरुण चांगरे यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांकडे केली आहे. तसेच प्रभाग १६ ड मधून आपली उमेदवारी कायम ठेवण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.चांगरे यांनी प्रभाग १६ ड मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. मात्र, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी माघार घेतली. निवडणूक आयोगाच्या आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, काही उमेदवार निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या खर्चापेक्षा जास्त खर्च करीत असून, मतदारांना प्रलोभन देण्याचे काम करीत आहेत.अशा उमेदवारांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच भांडवलदार उमेदवारांकडील मालमत्तेचा तपशीलनुसार शहरातील व शहराच्या परिसरातील ठिकाणांवर गुप्तचर यंत्रणेमार्फत लक्ष ठेवण्याची त्यांनी मागणी केली आहे.यासह एका उमेदवाराने मतदारांना सोन्याचे नाणे व अंगठी वाटण्याचे आश्वासन दिले असून, या प्रकरणी चौकशी करण्यात यावी व संबिधत उमेदवारांच्या दैनंदिन खर्चावर बारकाईने लक्ष ठेवण्याची मागणीही त्यांनी केली आहे. तसेच माझी उमेदवारी ही दबावामुळे मागे घेतली असल्याने उमेदवारी प्रभाग १६ ड मधून कायम ठेवण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.
जळगाव महापालिका निवडणूक : दबावामुळे घेतली निवडणुकीतून माघार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 2:38 PM
प्रभाग १६ ड मधून माघार घेण्यासाठी एका उमेदवारांने आपल्यावर दबाव टाकल्याने उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागला, अशी तक्रार माजी नगरसेवक अरुण चांगरे यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांकडे केली आहे.
ठळक मुद्देअरुण चांगरे यांची निवडणूक आयुक्तांकडे तक्रार उमेदवारी कायम ठेवण्याची मागणीकाही उमेदवार निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या खर्चापेक्षा जास्त खर्च करीत आहे