जळगाव मनपा निवडणूक : प्रभाग क्रमांक ७मध्ये जुन्या व नव्यांमध्ये रंगणार सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 12:47 PM2018-07-15T12:47:22+5:302018-07-15T12:48:15+5:30

आमदार सुरेश भोळे यांच्या पत्नी सीमा भोळे रिंगणात

Jalgaon Municipal Election: Matches will be played in old age and in division in ward no 7 | जळगाव मनपा निवडणूक : प्रभाग क्रमांक ७मध्ये जुन्या व नव्यांमध्ये रंगणार सामना

जळगाव मनपा निवडणूक : प्रभाग क्रमांक ७मध्ये जुन्या व नव्यांमध्ये रंगणार सामना

Next
ठळक मुद्देराजकीय क्षेत्रात नशीबप्रभाग ७ ड मध्ये दोन्हीही नवखेच

जळगाव : प्रभाग क्रमांक ७ मध्ये भाजपाने ३ विद्यमान नगरसेवकांना उमेदवारी दिली असून १ नवीन उमेदवार दिला आहे. तर शिवसेनेने नवे चेहरे दिले आहेत. अ मध्ये आमदार सुरेश भोळे यांच्या पत्नी व नगरसेविका सीमा भोळे या भाजपाकडून निवडणूक रिंगणात असून त्यांच्या विरोधात शिवसेनेने साधना प्रदीप श्रीश्रीमाळ यांना यांना उमेदवारी दिली आहे.
सीमा भोळे गेल्या वेळी प्रथमच नगरसेविका झाल्या. पती सुरेश भोळे आमदार आहेत. तर साधना श्रीश्रीमाळ या सामाजिक कार्यकर्ते प्रदीप श्रीश्रीमाळ यांच्या पत्नी आहे. मुलगा तेजस श्रीश्रीमाळ युवा शक्ती फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमात सहभागी असतो. तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ओबीसी सेलच्या प्रदेश सरचिटणीस सविता बोरसे यांची उमेदवारी असून त्या पहिल्यांदाच मनपाची निवडणूक लढवत आहे. दरम्यान साधना श्रीश्रीमाळ यांना प्रभाग क्रमांक १६ ब मधूनही शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. प्रभाग ७ ब मध्ये भाजपाच्या नगरसविका दीपमाला मनोज काळे आणि शिवसेनेच्या अंकिता पंकज पाटील अशी दुरंगी लढत आहे. दीपमाला काळे यांचे पती मनोज काळे हे देखील माजी नगरसेवक असून माजी नगराध्यक्ष बंडू काळे व सुधा काळे यांच्या परिवारातील त्या आहेत. तर अंकिता पाटील या पती पंकज पाटील यांच्यासह नेहमीच विविध सामाजिक उपक्रमात सहभागी होतात, अशी त्यांची ओळख आहे. राजकीय क्षेत्रात ते आपले नशीब अजमावत आहे.
प्रभाग ७ क मध्ये भाजपाकडून नगरसेवक डॉ. अश्विन शांताराम सोनवणे, शिवसेनेकडून रत्नाकर एकनाथ झांबरे तर काँग्रेसकडून स्वप्नील साबळे यांची उमेदवारी आहे. डॉ. अश्विन सोनवणे हे एकूण तीन वेळेस नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. त्यांच्या विरोधातील दोन्ही उमेदवार मात्र नवखे आहेत. रत्नाकर झांबरे हे माजी पोलीस अधिकारी असून त्यांचाही जनसंपर्क चांगला आहे. तर स्वप्नील साबळे हे काँग्रेसेचे ज्येष्ठ कार्यकर्ते उल्हास साबळे यांचे पुत्र आहे.
प्रभाग ७ ड मध्ये दोन उमेदवार असून दोन्हीही नवखेच आहेत. यापैकी भाजपाचे उमेदवार सचिन भीमराव पाटील यांची स्वत:ची शैक्षणिक संस्था आहे. त्यांच्या विरोधात असलेले शिवसेनेचे उमेदवार योगेश सीताराम पाटील हे नवे असले तरी त्यांना कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी आहे. त्यांचे आजोबा राजोरा ता. यावल येथे सरपंच होते तर वडील जि.प. सदस्य होते. पं.स.चे उपसभापतीही होते. योगेश पाटील हे अ.भा. वारकरी मंडळाचे जिल्हा संपर्क प्रमुख असून अंजाळेच्या जगन्नाथ महाराज ट्रस्टचे विश्वस्त आहे.

Web Title: Jalgaon Municipal Election: Matches will be played in old age and in division in ward no 7

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.