जळगाव महापालिका निवडणूक : विद्यमान ४५ नगरसेवक पुन्हा निवडणूक रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 02:19 PM2018-07-19T14:19:57+5:302018-07-19T14:26:20+5:30
जळगाव मनपा निवडणुकीत एकुण ३०३ उमेदवारांमध्ये ४५ विद्यमान नगरसेवक पुन्हा एकदा रिंगणात उतरले असून सात नगरसेवकांनी आपल्या पत्नी, मुलगा व आईला संधी दिली आहे.
जळगाव : मनपा निवडणुकीत एकुण ३०३ उमेदवारांमध्ये ४५ विद्यमान नगरसेवक पुन्हा एकदा रिंगणात उतरले असून सात नगरसेवकांनी आपल्या पत्नी, मुलगा व आईला संधी दिली आहे.
महानगरपालिकेच्या रणधुमाळीला आता सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत ७५ विद्यमान नगरसेवकांपैकी ४५ नगरसेवक निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर काही नगरसेवकांनी यंदा निवडणुकीतून स्वेच्छेने माघार घेतली तर काही नगरसेवकांचा पक्षांकडून पत्ता कापण्यात आला आहे.
राष्टÑवादीकडून दोन तर अपक्ष म्हणून दोन नगरसेवक रिंगणात
राष्टÑवादी कॉँग्रेसने अश्विनी देशमुख व दिपाली पाटील या दोन विद्यमान नगरसेविकांना संधी दिली आहे. तर भाजपाने जयश्री नितीन पाटील या विद्यमान नगरसेविकेचे तिकीट कापल्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला असला, तरी शिवसेनेने त्यांना पुरस्कृत केले आहे. तर लिना पवार यांनी शिवसेनेकडून अर्ज दाखल केला होता. मात्र, एबी फॉर्ममध्ये त्रुटी आढळल्यामुळे त्या शिवसेना पुरस्कृत अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहे.
सात नगरसेकांनी कुटुंबीयांना दिली संधी
सात विद्यमान नगरसेवकांनी यावेळी माघार घेतली असली तरी कुटुंबातीलच सदस्यांना उमेदवारी दिली असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये सायराबी अशोक सपकाळे यांच्याऐवजी त्यांचा मुलगा राजू सपकाळे यांना संधी दिली आहे. संदेश भोईटे यांच्या ऐवजी त्यांच्या पत्नी स्रेहा भोईटे, सुभद्रा नाईक यांच्या ऐवजी मुलगा प्रशांत नाईक, कंचन सनकत यांच्या ऐवजी पती चेतन सनकत, उज्वला बाविस्कर यांच्या ऐवजी पती किशोर बाविस्कर निवडणूक रिंगणात उभे आहेत.
भाजपाकडून २० विद्यमान निवडणुकीच्या आखाड्यात
भाजपामध्ये निवडणुकीच्या तोंडावर राष्टÑवादी, खाविआ व मनसेच्या काही नगरसेवकांनी प्रवेश घेतला. यामधून काही नगरसेवकांना भाजपाने संधी दिली आहे. भाजपाने या निवडणुकीत २० विद्यमान नगरसेवकांना संधी दिली आहे. यामध्ये दत्तात्रय कोळी, भारती सोनवणे, सदाशिव ढेकळे, नवनाथ दारकुंडे, गायत्री शिंदे, प्रतिभा कापसे, सुरेश सोनवणे, शोभा बारी, सुनील माळी, डॉ.आश्विन सोनवणे, सीमा भोळे, दीपमाला काळे, अॅड.शुचिता हाडा, उज्वला बेंडाळे, रविंद्र पाटील, ज्योती चव्हाण, अनिल देशमुख, कांचन सोनवणे, ललित कोल्हे, सिंधूताई कोल्हे यांचा समावेश आहे.
शिवसेनेकडून २१ विद्यमान नगरसेवकांना संधी
शिवसेनेने या निवडणुकीत विद्यमान २१ नगरसेवकांना संधी दिली आहे. यामध्ये संगिता दांडेकर, राखी सोनवणे, नितीन लढ्ढा, वर्षा खडके, श्यामकांत सोनवणे, शितल चौधरी, अमर जैन, ज्योती तायडे, ममता कोल्हे, विष्णु भंगाळे, चेतन शिरसाळे, शबानाबी सादीक, सुनील महाजन, जयश्री महाजन, हेमलता नाईक, जिजाबाई भापसे, नितीन बरडे, लता सोनवणे, मुख्तार बी.पठाण, पृथ्वीराज सोनवणे व अनंत जोशी यांचा समावेश आहे.