जळगाव : मनपा निवडणुकीच्या राजकीय आखाड्यात प्रभाग ४ मधील चारही लढती रंगतदार ठरणार आहेत. प्रभाग ४ मधील ब वॉर्ड हा ओबीसी महिलांसाठी राखीव असून, या प्रभागात महापौरपदासाठी लढत रंगणार असल्याने जळगावकरांचे लक्ष या लढतीकडे लागले आहे.प्रभाग ४ मधील अ व ब वॉर्डमध्ये भाजपा, शिवसेना व आघाडी अशी तिरंगी लढत रंगेल. तर क व ड मध्ये भाजपा व शिवसेना अशी थेट लढत होईल. कोळी समाजबांधव, मुस्लिम समाज व लेवा बहुल असलेल्या या प्रभागात सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवार देताना प्रभागातील अभ्यास करूनच उमेदवारांची निवड केलेली दिसून येत आहे.शिवचरण ढंढोरे विरुद्ध चेतन सनकत यांच्यात लढतप्रभाग ४ अ मधील लढत देखील तिन्ही उमेदवारांसाठी ‘टफ’ ठरणार आहे. भााजपाने माजी नगरसेविका कंचन सनकत यांचे पती चेतन सनकत यांना उमेदवारी दिली आहे. तर शिवसेनेने माजी नगराध्यक्ष शिवचरण ढंढोरे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे युवा व अनुभवी उमेदवारात ही लढत रंगणार आहे. या लढतीकडे देखील अनेकांचे लक्ष लागले आहे.या प्रभागात येतो हा भागशनिपेठ, दालफळ, चौघुले मळा, ओक प्लॉट, बळीरामपेठ, शनिपेठ, नानकनगर, जोशीपेठ, मारोती पेठ, बालाजीपेठ, रामपेठ, विठ्ठल पेठ या परिसराचा प्रभाग ४ मध्ये समावेश आहे.हे उमेदवार आहेत रिंगणातप्रभाग ४ अ मध्ये मनसेतून भाजपामध्ये गेलेल्या कंचन सनकत यांचे पती चेतन सनकत, शिवसेनेकडून माजी नगराध्यक्ष शिवचरण ढंढोरे तर राष्टÑवादी काँग्रेसकडून भारती मोरे यांच्यात लढत आहे.प्रभाग ४ ब मध्ये देखील तिरंगी लढत रंगणार असून, यामध्ये भाजपाने पाचवेळा नगरसेविका व माजी उपमहापौर असलेल्या भारती सोनवणे यांना मैदानात उतरविले आहे. तर शिवसेनेने देखील तोडीसतोड उमेदवार देत माजी महापौर जयश्री धांडे यांना संधी दिली आहे. राष्टÑवादीकडून अर्पणा भालोदकर यांना मैदानात उतरविले आहे.प्रभाग ४ क मध्ये भाजपाकडून माजी नगरसेवक किशोर चौधरी यांच्या पत्नी चेतना चौधरी, शिवसेनेकडून सिनत अय्याज अली यांच्यात लढत आहे. तर ४ ड मध्ये भाजपाचे मुकुंदा सोनवणे व शिवसेनेचे मो.खालीद मो.बागवान यांच्यात लढत आहे.सोनवणे व धांडे यांची कसोटीमाजी नगरसेवक कैलास सोनवणे यांनी त्यांच्या पत्नी भारती सोनवणे यांना भाजपाकडून उमेदवारी दिली आहे. खाविआमधून राजीनामा देत कैलास सोनवणे यांनी भाजपात प्रवेश केला. त्या दृष्टीने त्यांना रोखण्यासाठी शिवसेनेने देखील कंबर कसली असून माजी महापौर जयश्री धांडे यांना मैदानात उतरवित भारती सोनवणेंसमोर तगडे आव्हान निर्माण केले आहे. कैलास सोनवणे यांचे या प्रभागात आतापर्यंत वर्चस्व असले तरी जुन्या जळगावचा काही भाग या प्रभागात जोडला गेल्यामुळे सोनवणेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. तसेच राष्टÑवादीच्या उमेदवार अर्पणा भालोदकर यांचाही जनसंपर्क दांडगा असल्याने येथे तिरंगी लढत रंगण्याची शक्यता आहे. यात कोणत बाजी मारते याकडे जळगावरांचे लक्ष लागून आहे.शिवचरण ढंढोरे विरुद्ध चेतन सनकत यांच्यात लढतप्रभाग ४ अ मधील लढत देखील तिन्ही उमेदवारांसाठी ‘टफ’ ठरणार आहे. भााजपाने माजी नगरसेविका कंचन सनकत यांचे पती चेतन सनकत यांना उमेदवारी दिली आहे. तर शिवसेनेने माजी नगराध्यक्ष शिवचरण ढंढोरे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे युवा व अनुभवी उमेदवारात ही लढत रंगणार आहे. या लढतीकडे देखील अनेकांचे लक्ष लागले आहे.या प्रभागात येतो हा भागशनिपेठ, दालफळ, चौघुले मळा, ओक प्लॉट, बळीरामपेठ, शनिपेठ, नानकनगर, जोशीपेठ, मारोती पेठ, बालाजीपेठ, रामपेठ, विठ्ठल पेठ या परिसराचा प्रभाग ४ मध्ये समावेश आहे.
जळगावात प्रभाग ४ मध्ये रंगणार महापौरपदासाठी लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 11:36 AM
जयश्री धांडे विरुद्ध भारती सोनवणे यांच्यात टक्कर
ठळक मुद्देचुरसजळगावकरांचे लढतीकडे लक्ष