जळगावात प्रभाग क्र. ११ मध्ये माजी महापौरांसह ५ नगरसेवक रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 11:39 AM2018-07-14T11:39:16+5:302018-07-14T11:39:58+5:30

चारही जागांसाठी होणार चुरशीची लढत

Jalgaon ward no. In 11 of the 5 corporators, including the former Mayors, in the field | जळगावात प्रभाग क्र. ११ मध्ये माजी महापौरांसह ५ नगरसेवक रिंगणात

जळगावात प्रभाग क्र. ११ मध्ये माजी महापौरांसह ५ नगरसेवक रिंगणात

Next
ठळक मुद्दे लढत चुरशीची ठरणारशहराचे लक्ष

जळगाव : प्रभाग क्र.११ मध्ये माजी महापौर ललित कोल्हे यांच्यासह ५ विद्यमान नगरसेवक तसेच एक नगरसेवक पत्नी असे दिग्गज एकमेकांविरोधात रिंगणात उतरले असल्याने या प्रभागातील चारही जागांसाठी चुरशीच्या लढती होणार आहेत.
प्रभाग क्र.११ हा मनसेचे नगरसेवक संतोष पाटील व पार्वताबाई भिल यांच्या प्रभाग क्र.१६ ला नितीन नन्नवरे व सिंधुताई कोल्हे यांच्या प्रभाग १८चा काही भाग व महापौर ललित कोल्हे व मनसेच्याच लिना पवार यांच्या प्रभाग १७ चा काही भाग जोडून तयार झाला आहे. मनसेचा प्रभाव असलेले दोन प्रभाग फुटले आहेत. त्यांचे भाग या प्रभागात जोडले गेलेले आहेत.
आता मागील निवडणुकीत मनसेकडून निवडून आलेले ललित कोल्हे, सिंधुताई कोल्हे, संतोष पाटील, पार्वताबाई दामू भिल या नगरसेवकांनी आता भाजपात प्रवेश केला आहे.
संतोष पाटील हे वगळता उर्वरित तिघांनी स्वत:च पुन्हा या प्रभागातून उमेदवारी मिळविली आहे. तर संतोष पाटील यांच्या पत्नी उषा संतोष पाटील यांना भाजपाची उमेदवारी मिळाली आहे.
दरम्यान या प्रभागातील अपक्ष उमेदवारांबाबत मात्र निवडणूक अधिकाऱ्यांकडून अद्यापही माहिती मिळालेली नाही.
या प्रभागात एकमेकाविरोधात सर्वच प्रभावी उमेदवार उतरल्याने या सर्वच लढती चांगल्याच रंगणार असून या प्रभागाचेच नव्हे तर संपूर्ण शहराचे लक्ष या प्रभागातील लढतींकडे लागले आहे.
११-ब मध्ये भाजपाच्या उषा संतोष पाटील व शिवसेनेच्या हर्षाली प्रदीप वराड यांच्या लढत रंगणार आहे.
अशी होणार लढत
११-अ च्या जागेसाठी भाजपाच्या पार्वताबाई दामू भिल यांच्याविरोधात चार वेळा नगरसेवकपदी निवडून आलेले व आता पाचव्यांदा निवडणूक रिंगणात असलेले श्यामकांत बळीराम सोनवणे हे शिवसेनेकडून तर राष्टÑवादीकडून सायरा तडवी रिंगणात आहेत.
११-क मध्ये भाजपाच्या सिंधुताई विजय कोल्हे, शिवसेनेच्या लिना राम पवार यांच्यात लढत आहे. लिना पवार या देखील विद्यमान नगरसेवक असून मागील निवडणुकीत मनसेकडूनच निवडून आल्या होत्या. मात्र आता शिवसेनेकडून निवडणूक लढवित आहेत. मागील निवडणुकीत सोबत रणनिती आखून निवडणूक लढविणारेच आता एकमेकांविरोधात रिंगणात उभे ठाकल्याने ही लढत चांगलीच रंगणार आहे. राम पवार यांचाही जनसंपर्क दांडगा असल्याने लढत चुरशीची ठरणार आहे.
सुरेशदादा जैन यांच्याच खाविआच्या पाठिंब्यावर महापौरपद भूषविलेल्या ललित विजय कोल्हे हे भाजपाकडून या प्रभागात ११-ड च्या जागेसाठी रिंगणात आहेत. तर त्यांच्याविरोधात शिवसेनेचे बुधा दला हटकर, काँग्रेसचे शिवराम पाटील रिंगणात आहेत.

Web Title: Jalgaon ward no. In 11 of the 5 corporators, including the former Mayors, in the field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.