निधीच्या खर्चावरून जळगाव जि.प.ची सभा गाजण्याचे चिन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 12:38 PM2018-03-17T12:38:42+5:302018-03-17T12:38:42+5:30
२३ रोजी सर्व साधारम सभा
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. १७ - २१ कोटींचे नियोजन असलेल्या जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पाच्या मंजुरीसाठी २३ मार्च रोजी जि.प.ची सर्वसाधरण सभा दुपारी एक वाजता अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांच्या उपस्थित होणार आहे. गेल्या वर्षाचा डीपीडीसी व इतर निधी मार्च महिना आला तरी खर्च न झाल्याने विरोधकांकडून अर्थसंकल्पीय सभा गाजण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
गेल्या वर्षी नियोजन करण्यात आलेला महिला बालकल्याण व समाज कल्याण विभागाचा निधी खर्च झाला नाही. त्यातच रस्त्यांच्या कामांचे आता कायार्देश दिले जात आहे. हा निधी मार्च अखेर खर्च होणे शक्य नसल्याने याच मुद्यावर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांची कोंडी केली जाण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या उत्पन्नात यावर्षी १ कोटीची घट झाली आहे. उत्पन्नाचे स्त्रोत शोधण्यास व उत्पन्न वाढविण्यात सत्ताधाºयांना अपयश आल्याने या वर्षी २०१७-१८ चा सुधारीत व २०१८-१९ चा मूळ अर्थसंकल्प मंजूर करताना कसरत करावी लागणार असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी अर्थ समितीने अर्थसंकल्प मंजुरीची शिफारस सर्वसाधारण सभेत केली आहे.
व्यापारी गाळेही ठरणार कळीचा मुद्दा
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गेल्या तीन महिन्यांपूर्वीच अल्पबचत भवनातील करार संपलेल्या २० गाळ््यांचा विषय घेण्यात आला होता. १४ वर्ष होवूनही गाळे लिलाव करण्यात आले नसल्याने त्या गाळ्यांची संबंधितांकडून थकबाकी व्याजासह वसूल करून नव्याने लिलाव करण्याचा ठराव करण्यात आला होता. मात्र तीन महिन्यात प्रशासनाकडून काहीच कार्यवाही करण्यात आले नाही. परिणामी जि.प.ला उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे हा विषय गाजण्याची शक्यता आहे.
जळगाव, एरंडोल, रावेर तालुक्यातील २३ शाळा जीर्ण झाल्याने त्यांच्या निर्लेखनाचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. तसेच ग्रामविकास निधीतून कर्ज मंजुरीचा ठरावदेखील विषय सूचीत ठेवण्यात आला आहे. एकूण १० विषयांवर सर्वसाधारण सभेत चर्चा करून मंजुरी घेतली जाणार आहे.