जामनेरला खुल्या भूखंडात मुलांसाठी खेळाची साहित्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 05:32 PM2020-01-01T17:32:07+5:302020-01-01T17:33:32+5:30
पालिकेकडून शहरातील खुल्या भूखंडावर विकसित केलेल्या जागेत मुलांसाठी खेळण्यासाठी व व्यायामासाठी साहित्य उपलब्ध करून दिले जात आहे.
जामनेर, जि.जळगाव : पालिकेकडून शहरातील खुल्या भूखंडावर विकसित केलेल्या जागेत मुलांसाठी खेळण्यासाठी व व्यायामासाठी साहित्य उपलब्ध करून दिले जात आहे. यासाठी शासनाकडून एक कोटी ६० लाखाचा निधी मिळाला असल्याची माहिती मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी दिली.
पालिकेने शहरातील खुले भूखंड विकसित केले आहेत. शहरातील गिरीजा कॉलनी, तुलसीनगर, पांडुरंगनगर, पाटील वाडी, द्वारकादर्शन पार्क, शिवशक्तीनगर, मदनीनगर आदी भागात मुलांना खेळण्यासाठी व व्यायामासाठी साहित्य खरेदी करण्यात आली आहे. उद्यानात बसविण्याचे काम सुरू असल्याचे पाटील यांनी सांगितले.
सद्य:स्थितीत शिवाजीनगर, डोंगरे महाराजनगर व वाकी रोडवर पालिकेचे उद्यान आहेत. शहराचा वाढता विस्तार व नवीन वसाहती पाहता आणखी उद्यानांची आवश्यकता आहे.
खुल्या भूखंडात परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंच ठेवण्यात आल्याने मोठी सुुविधा झाली आहे.
नागरिकांच्या सुविधेसाठी व लहान मुलांना खेळण्यासाठी पालिकेने उपलब्ध करून दिलेल्या साहित्याचा काळजीपूर्वक वापर करून पालिकेस सहकार्य करावे.
-साधना महाजन, नगराध्यक्ष