जळगावात वृध्देच्या डोक्यात काठी मारुन लांबविले दागिने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 11:56 AM2018-02-19T11:56:44+5:302018-02-19T12:02:08+5:30
प्लॉट विक्रीच्या बहाण्याने वकीलाच्या घरात घुसला ‘ब्रोकर’. पोलिसांनी केली दोघांना अटक
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि. १९ : प्लॉट विक्री करायचा आहे का? अशी विचारणा करायला गेलेल्या इस्टेट ब्रोकर व त्याच्या सोबतच्या एका जणाने प्रमिला भास्कर महाजन (वय ८१ रा. प्रताप नगर, जळगाव) यांच्या डोक्यात काठी मारुन पाच ग्रॅमची सोन्याची अंगठी व बेंटेक्सचे दागिने लांबविल्याची घटना शनिवारी दुपारी तीन वाजता घडली. जखमी प्रमिला या अॅड.सतीश महाजन यांच्या आई आहेत.
दरम्यान, या घटनेतील वृध्दा रविवारी सकाळी शुध्दीवर आल्यानंतर त्यांनी दिलेल्या वर्णनावरुन भरत खंडेलवाल (रा. गणेश कॉलनी, जळगाव) व हर्षल कुळकर्णी (रा.यावल, ह.मु.गणेश कॉलनी, जळगाव) या दोघांना १२ तासातच पोलिसांनी जेरबंद केले. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अॅड.सतीश महाजन यांनी दिलेली माहिती अशी की, शनिवारी प्रमिला महाजन या एकट्याच घरी होत्या. अॅड.महाजन हे न्यायालयात तर त्यांचे भाऊ संजय महाजन रेल्वे स्टेशनला गेले होते. दुपारी तीन वाजता त्यांच्या घरी दोन जण आले. त्यातील भरत खंडेलवाल याने तुमचा प्लॉट विक्री करायचा आहे का? माझ्याकडे गिºहाईक आहे अशी माहिती प्रमिला महाजन यांना दिली. त्यावर प्लॉट विक्री करायचे नाही असे माझे मुले म्हणतात असे सांगून त्याला नकार दिला.
प्रमिला महाजन यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार केल्यावर सायंकाळी त्या शुध्दीवर आल्या. त्यांनी झाल्या प्रकाराची माहिती मुलगा अॅड.महाजन यांना दिली. मारहाण करणारा व्यक्ती आपल्याकडे यापूर्वी प्लॉटसाठी आलेला होता, त्याच्याशी नातेवाईकानेही व्यवहार केला असून तो ब्रोकर असल्याची माहिती दिल्यानंतर अॅड.महाजन यांनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशन गाठून पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांना घटनेची माहिती दिली.