पारोळा : तालुक्यातील जोगलखेडे येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुनंदाबाई भरत पाटील, तर उपसरपंचपदी सुनीता संदीप पाटील यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी मुदतीच्या आधी सरपंच व उपसरपंच पदासाठी एक एकच उमेदवारी अर्ज दाखल होते. निवडणूक निर्णय अधिकारी सुनील पाटील यांनी ही निवड बिनविरोध जाहीर केली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य रंभाबाई भाऊराव पाटील, शालिनी किशोर पाटील, सुनीता जिजाबराव भिल, वर्षा अनिल पाटील, सायांकाबाई साहेबराव पाटील हे ग्रामपंचायत सदस्य हजर होते. यावेळी माजी सरपंच रामराव काळू पाटील, वीरभान भिकन पाटील, धर्मा दगा पाटील, मुरलीधर शंकर पाटील, बापू धना पाटील, युवराज पाटील, नाना पाटील, विनायक पाटील, गोपाल पाटील, लोटन पाटील, रवींद्र पाटील, संजय पाटील, दादाभाऊ पाटील, विठ्ठल पाटील, मनोहर पाटील, शंकर भिल, मनोहर पाटील, मोतीराम पाटील, राजू पाटील, प्रकाश पाटील, समाधान पाटील, किशोर पाटील, संदीप पाटील आदी उपस्थित होते.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुनील अमृत पाटील, पोलीस कर्मचारी अरुण राठोड व पोलीस पाटील रुपाली पाटील उपस्थित होते.
जोगलखेडे सरपंच सुनंदाबाई पाटील बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 5:42 PM