जळगाव : पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू असल्याने अभ्यासासाठी नोटस् मिळत नसल्यामुळे काही दिवसांपासून तनावात असलेल्या शुभांगी सिताराम सोनवणे (वय-२५, रा़ साळशिंगी, ता़ बोदवड) या तरूणीने उंदीर मारण्याचे औषध प्राशन केले होते़ अखेर तीन दिवस मृत्यूशी झुंझ दिल्यानंतर मंगळवारी सकाळी ८़२० वाजता शुभांगीची खाजगी रूग्णालयात ज्योत मालवली़ याबाबत शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू नोंद झाली.या संदर्भात नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी, बोदवड तालुक्यातील साळशिंगी गावात शुभांगी ही आईसह वास्तव्यास होती़ वडील नसल्यामुळे घरची जबाबदारी तिच्यावरच होती़ त्यामुळे एका खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षीका म्हणून काम करून घरचा उदरनिर्वाह ती करीत होती़ तसेच ती यशवंतराव मुक्त विद्यापीठात एम़ए़ इंग्रजीचे शिक्षण सुध्दा घेत होती़ सध्या एम़ए. च्या परीक्षा सुरू होत्या़ मात्र, तिला अभ्यासाठी काही दिवसांपासून नोटस् मिळत नव्हत्या़ याच तनावात तिने शनिवारी उंदीर मारण्याचे औषध प्राशन केले़शनिवारी खाजगी रूग्णालयात उपचार सुरू असताना तिची मृत्यूशी झुंझ सुरू होती़ मात्र, अखेर तीन दिवसानंतर मंगळवारी सकाळी ८़२० वाजता तिचा मृत्यू झाला़ यावेळी कुटूंबीयांनी एकच आक्रोश केला. दरम्यान, अभ्यासात हुशार असताना हा प्रसंग कसा घडला, याबाबत कुटूंबीयांनी उपचारादरम्यान तिला विचारणा केली असता परीक्षा सुरू असताना नोटस् मिळत नसल्यामुळे तनावात येऊन उंदीर मारल्याचे औषध प्राशन केल्याचे नातेवाईकांनी सांगितले.परीक्षेवेळी झाली उलटीशुंभागी हिने विषारी औषध प्राशन केले ही बाब कुटूंबीयांच्या लक्षात आली नाही़ त्याच दिवशी पेपर असल्यामुळे ती परीक्षा केंद्रात विषारी द्रव्य सेवन करून पेपर देण्यासाठी गेली़ त्यावेळी औषधीचा परिणाम जाणवू लागल्यामुळे तिला उलट्या झाल्या़ अन् तिला रात्री ११ वाजता शहरातील खाजगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले़
नोटस् न मिळाल्याने तरूणीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 12:16 PM