नंदुरबारात कांदा फेकला रस्त्यावर

By admin | Published: June 2, 2017 12:04 AM2017-06-02T00:04:23+5:302017-06-02T00:04:23+5:30

रास्ता रोकोचा प्रय} : शेतकरी आजपासून आंदोलन तीव्र करणार

On the Kanda Falka road in Nandurbar | नंदुरबारात कांदा फेकला रस्त्यावर

नंदुरबारात कांदा फेकला रस्त्यावर

Next

नंदुरबार : शेतकरी संपाचे पडसाद नंदुरबारातही उमटले. कांदा भरून जाणा:या ट्रकला अडवून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकत्र्यानी कांदे  रस्त्यावर फेकून दिले. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर कार्यकत्र्याना तेथून हटकण्यात आले. दरम्यान, शहरातील चारही चौफुलींवर मोठय़ा प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
सरकारकडून कजर्माफीची घोषणा होत नसल्याने तसेच इतर विविध मागण्यांसाठी बुधवारी मध्यरात्रीपासून राज्यातील शेतक:यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. ठिकठिकाणी संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. नंदुरबारातदेखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकत्र्यानी बुधवारी दुपारी आंदोलन केले. कांदा भरून जाणारा ट्रक अडवून कांदे रस्त्यावर फेकले. या वेळी सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या. उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार यांनी कार्यकत्र्याची समजूत घातली. त्यानंतर आंदोलकांना तेथून दूर नेण्यात आले. या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष घनश्याम चौधरी, तालुकाध्यक्ष कृष्णदास पाटील, जीवन पाटील, गोरख पाटील, रवींद्र पाटील, छोटू पाटील, मोहन पाटील, सुरेश पाटील, परसू पाटील, योगेश चौधरी आदींनी सहभाग घेतला.
राज्यात ठिकठिकाणी आंदोलनाचे लोण पाहता पोलीस विभागातर्फे सतर्कता बाळगण्यात आली होती. ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.  पोलीस अधीक्षक राजेंद्र डहाळे, अपर अधीक्षक प्रशांत वाघुंडे, उपअधीक्षक रमेश पवार, निरीक्षक  गिरीश पाटील, मिलिंद वाघमारे, सुभाष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.
(विशेष पान/हॅलो तीन)

Web Title: On the Kanda Falka road in Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.