कन्नड घाटात तीन ठिकाणी दरड कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2021 01:34 PM2021-08-31T13:34:14+5:302021-08-31T13:34:50+5:30

सोमवारी रात्री झालेल्या पावसामुळे तितूर व डोंगरी नद्यांना पूर आला आहे. या पुराच्या पाण्यात दोन जण अडकल्याचा अंदाज आहे.

In Kannada Ghat, pain collapsed in three places, | कन्नड घाटात तीन ठिकाणी दरड कोसळली

कन्नड घाटात तीन ठिकाणी दरड कोसळली

googlenewsNext
ठळक मुद्देतितूर डोंगरीच्या पूरात दोन जण अडकल्याचा संशय

लोकमत न्यूज नेटवर्क

चाळीसगाव :  चाळीसगाव तालुक्यात सोमवारी रात्री झालेल्या पावसामुळे तितूर व डोंगरी नद्यांना पूर आला आहे. या पुराच्या पाण्यात दोन जण अडकल्याचा अंदाज असून तहसिलदार अमोल मोरे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे एसडीआरएफ पथकाची मागणी केली. त्यानुसार पथक दुपारी घटनास्थळी दाखल झाली असून माहिती घेतली जात आहे.या घटनेने तालुक्यात जनतेत भयावह स्थिती निर्माण झाली आहे.

 मन्याड प्रकल्प पूर्ण भरल्याने गिरणा नदीपात्र तसेच जामदा बंधार्‍यातून किमान १५०० क्यूसेक प्रवाह आहे. त्यामुळे तितूर, डोंगरी व गिरणा नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर दुसरीकडे तर कन्नड घाटात दरड कोसळल्याने वाहतुक विस्कळीत झाली असून ही वाहतूक नांदगाव शिवूर बंगला मार्गाने वळविण्यात आली आहे. 

 सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे तितूूर व डोंगरी नद्यांना पूर आला आहे. या पुरामुळे चाळीसगाव शहरातील नदीकाठच्या परिसरातील नागरी वसाहतीत पाणी शिरले आहे. या पुरात चाळीसगाव शहरातील दोन इसम अडकले असल्याचा अंदाज असून तीन ते चार गावांना पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. त्यामुळे तेथे संपर्क होऊ शकत नसल्याचे चाळीसगाव तहसिलदार अमोल मोरे यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या संदेशात म्हटले आहे.

 पुरात अडकलेल्या व्यक्तींच्या बचावासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची मदत मागविण्यासाठी अवर सचीव नियंत्रण कक्ष मंत्रालय तसेच जिल्हाधिकारी यांना संदेश देण्यात आल्यानुसार धुळे राज्य राखीव पोलीस बल तसेच एसडीआरएफ पथक पाठविण्याचे निर्देशानुसार मदत कार्य केले जात आहे.

कन्नड घाटात तीन ठिकाणी दरडी कोसळल्या

रात्रीच्या वेळी मुसळधार पावसामुळे कन्नड घाटात दोन ते तीन ठिकाणी दरडी कोसळल्या तर काही ठिकाणी झाडे देखिल उन्मळून पडली असून सर्वत्र दगडांचा खच व चिखल असल्याने अनेक वाहने रस्त्यात अडकली आहे. त्यामुळे कन्नड घाटात वाहतुक खोळंबली आहे. कन्नड औरंगाबादकडे तसेच चाळीसगाव शहराकडे सुमारे आठ ते दहा कि.मी. अंतरापर्यत वाहने खोळंबली आहेत. राज्य आपत्ती प्रतिसाद दल व स्थानिक वाहतूक पोलीस प्रशासनातर्फे मदत व बचाव कार्य केले जात आहे. मंगळवारी सकाळपासून पावसाच्या सरी सुरूच आहे.

Web Title: In Kannada Ghat, pain collapsed in three places,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.