खडसेंचा गुरुवारी मुबईत राष्ट्रवादी प्रवेश होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2020 6:23 PM
जळगाव : भाजपचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबतच्या चर्चांना पूर्णविराम मिळण्याचे चिन्हे दिसून येत आहे. ...
जळगाव : भाजपचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबतच्या चर्चांना पूर्णविराम मिळण्याचे चिन्हे दिसून येत आहे. येत्या गुरुवारी खडसे यांचा मुंबई येथे राष्ट्रवादी प्रवेश घडणार आहे. जवळच्या आणि विश्वासू गोटातील कार्यकर्त्यां पर्यंत हा संदेश त्यांच्याकडून पोहचला असल्याचे सांगितले जाते. यानुसार मोठ्या संख्येने प्रमुख कार्यकर्ते मुबंईच्या तयारीला लागले आहेत. दरम्यान एकनाथराव खडसे यांनी आजही संभाव्य राष्ट्रवादी प्रवेशाबाबत तुम्हीच मीडियावाले मुहूर्त ठरवतात असे सांगून प्रवेशाचा सस्पेन्स कायम ठेवला आहे.याअगोदरपासून एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची जोरदार चर्चा असून ते शनिवारी घटस्थापनेच्या मुहूर्तावर पक्षांतर करणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, शुक्रवारी त्यांनी पक्षांतराबाबत ‘नो कॉमेंट’ असे उत्तर दिल्याने त्यांच्या ‘सीमोल्लंघनाबाबत’ तर्क-वितर्क लढविले जात होते आता हा ‘सीमोल्लंघन’ गुरुवारी घडणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.जळगाव जिल्ह्यातील रावेर बोरखेडा शिवारातील चार अल्पवयीन मुलांच्या हत्येची घटना शुक्रवारी घडली होती. या चारही मुलांवर रावेर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. या ठिकाणी कुटुंबीयांचं सांत्वन करण्यासाठी एकनाथ खडसे आणि गृह मंत्री अनिल देशमुख हे रावेर विश्राम गृहावरून एकाच वाहनात बोरखेडा गेले होते. दरम्यान या दोघां मध्ये बंदद्वार चर्चाही घडली होती.