खळवाडीला आग, लाखोंचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 07:51 PM2019-04-22T19:51:21+5:302019-04-22T19:51:42+5:30
रत्नापिंप्री येथील घटना: मतदान यंत्रे आगीपासून वाचली
रत्नापिंप्री, ता. पारोळा : रत्नापिंप्री येथे सोमवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अचानक खळवाडीला आग लागली. गावात एकीकडे लग्नात गर्दी व दुसरीकडे गावात दुपारी उन्हामुळे स्मशान शांतता होती. अशावेळी अचानक ही प्रचंड आग लागली. यामुळे १९ शेतकऱ्यांचा चारा व शेतीचे साहित्य मोठ्या प्रमाणात खाक होवून लाखो रुपयांचे नुकसान झाले.
या आगीत राजेंद्र पांडुरंग पाटील , भाऊसाहेब बाबूलाल पाटील , राजेेंंद्र देविदास पाटील, प्रभाकर देविदास पाटील, मुरलीधर दगा पाटील, गणेश दगडू पाटील, धुडकू गिरधर पाटील, बाळू बाजीराव वानखेडे, युवराज सैतान पाटील, दिनकर रघुनाथ पाटील, सुकलाल हसरत पाटील, अभिमान दौलत पाटील, विनायक कळू पाटील, सोनू मन्सारम पाटील, पंढरीनाथ महारु पाटील, लोटन दौलत पाटील, आबा नारायण पाटील, विजय हिरमन पाटील, प्रविण रामदास पाटील या सर्वं शेतकरी बांधवांचा चारा व शेड , शेतीपयोगी वस्तू आगीत खाक झाल्या. यामुळे सायंकाळी गुरांना टाकण्यास चारा नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली.
मतदान यंत्रे वाचली
मंगळवारी होणाºया मतदानाच्या दृष्टीने आलेले कर्मचारी भगवान पाटील व मनोज ठाकरे हे लघुशंकेला जात असता त्याचे लक्षात आले की, खळवाडीला आग लागली आहे. त्यांनी गावात लगेच फोन करून कळविले तोपर्यनत त्यांनी जवळच असलेली गुरेढोरे सोडली त्यामध्ये भगवान पाटील यांचे हाताला दुखापत झाली. लगेचच मतदान केंद्राला आग लागलेली पहिली व खोली उघडून पूर्ण सामान काढुन दुसरीकडे हलविला. तोपर्यत बाहेर लावलेले कागद , बॅनर जळून खाक झाले. मनोज ठाकरे यांचे प्रसंगधवनने मतदान केंद्रतील नुकसान वाचले.
आग विझविण्यासाठी पारोळा व अमळनेर अग्निशमनच्या गाड्या हजर झाल्या. अमळनेर तहसीलदार ज्योती देवरे, अमळनेर पीआय अनिल बडगुजर, पारोळा एपीआय जितद्र खैरनार यांनीही घटनास्थळी भेट दिली. अमळनेर अग्निशमन कर्मचारी नितीन खैरनार, भिका संदानशिव, फारुक शेख, दिनेश बिºहाडे, जफर खान, आनंदा झिम्बल, कमलेश पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. संध्याकाळपर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते.
नुकसान भरपाई मिळावी
ऐन दुष्काळात शेतकऱ्यांनी मुक्या प्राण्यांसाठी चाºयाची व्यवस्था करून ठेवली होती. मात्र या आगीमुळे संपूर्ण चारा जळून खाक झाला, अशा परिस्थितीत पैसे देऊनही चारा उपलब्ध होणार नाही. शासनाने लक्ष देऊन त्यांना झालेल्या नुकसानीचा मोबदला द्यावा व चाºयाची व्यवस्था करून द्यावी, अशी मागणी होत आहे.