काही दिवसांत धरणगाव शहरात नवीन शौचालयदेखील नागरिकांना वापरायला मिळणार असून विकासकामे जोरात सुरू आहेत. मात्र, एकीकडे उद्यान सुशोभीकरण तसेच विकासकामे जोरात असून दुसरीकडे नागरिकांनी नाराजी व्यक्त केलेली दिसून येत आहे.
या ठिकाणी सेना-भाजप प्रचंड आक्रमक झालेली दिसून येत आहे. भाजपचे बारा आमदार निलंबित झाल्याने त्यांनीही सेनेच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतलेली दिसून येते. त्याचबरोबर शिवसेनेनेदेखील शहरात भाजपचे आमदार ज्या पद्धतीने वागलेत, त्यांच्या निषेधार्थ आंदोलने केलेली दिसून येतात. अवघ्या चार ते सहा महिन्यांवर आलेल्या नगरपालिका निवडणुका याचीच तर रंगीत तालीम सुरू नाही ना? असा प्रश्न नागरिकांमार्फत उपस्थित होत आहे.
आजूबाजूच्या तालुक्यांतील मार्केट कमिटी प्रशासक संचालक मंडळ नेमणूक झाली असून धरणगावात अद्याप कृषी उत्पन्न बाजार समितीत सभापती व संचालक प्रशासक नेमणूक करण्यात आलेले नाही. याचेही रहस्य गुलदस्त्यातच आहे.