जळगाव - एरंडोल तालुक्यातील फरकांडे या गावचं नाव घेताच आठवतात ते झुलते मनोरे़ पण आता ते नामशेष झाले आहे़ या गावात पाणीटंचाई कायम पूजलेली, पावसाळाही त्याला अपवाद नव्हता़ धरणाच्या बुडीत क्षेत्रात विहिर करून तब्बल सात किलोमीटर अंतरावरून पाणी आणले़ गावात शुध्द व स्वच्छ पाण्याची व्यवस्था केली़ याशिवाय गावाचे जलयुक्तशिवार योजनेत निवड झाले आहे़ सांडपाणी व्यवस्थापन करून भूमिगत गटारी करण्यात आल्या आहेत़
फरकांडे येथील सरपंच किरण साहेबराव पाटील यांना जलव्यवस्थापन पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 4:11 PM