पारोळा बाजार समितीत शेत माल खरेदीसाठी उपाययोजनांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 06:59 PM2020-04-03T18:59:34+5:302020-04-03T19:03:41+5:30

बोटावर मोजण्याएवढे व्यापारी शेतकऱ्यांचा माल खरेदी करीत आहे. यामुळे शेतकऱ्यांना काही व्यापाºयांना उधारीने माल विकावा लागत आहे.

Lack of measures for purchase of farm goods in Parola Market Committee | पारोळा बाजार समितीत शेत माल खरेदीसाठी उपाययोजनांचा अभाव

पारोळा बाजार समितीत शेत माल खरेदीसाठी उपाययोजनांचा अभाव

Next
ठळक मुद्देसचिवांच्या आडमुठ्या धोरणाला सर्वच त्रस्तबोटावर मोजण्याएवढे व्यापारी शेतकऱ्यांचा माल खरेदी करीत आहे.

रावसाहेब भोसले
पारोळा, जि.जळगाव : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देश लॉकडाऊन आहे. पण जीवनावश्यक वस्तू अन्नधान्य खरेदी-विक्रीसाठी सूट देण्यात आली. पण पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीत सचिवांच्या आडमुठ्या धोरणामुळे आजूबाजूला सर्व ठिकाणी कृउबाचे मार्केट सुरू झाली. पण पारोळा येथे अद्यापपर्यंत कृउबा माल खरेदी विक्री बंद आहे. बोटावर मोजण्याएवढे व्यापारी शेतकऱ्यांचा माल खरेदी करीत आहे. यामुळे शेतकऱ्यांना काही व्यापाºयांना उधारीने माल विकावा लागत आहे.
प्रत्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समितीत जाऊन पाहिले असता कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यालय बंद होते. काही व्यापाºयांनी शेतकºयांचे गहू, बाजरी धान्य खरेदी केले होते. १७०० रुपयांचा भाव शेतकºयांना गव्हासाठी मिळाला होता. यात काही शेतकºयांना विचारणा केली असता त्यांनी घरात कापूस पडून आहे. आलेल्या अन्नधान्य गहू, बाजरी, दादर ठेवण्यासाठी जागा नाही. शेतातून थेट मार्केटला विक्रीसाठी आणले. यात काही व्यापाºयांनी उधारीवर माल खरेदी केला, तर काहींनी ट्रॅक्टर भाडे व उचल म्हणून थोडे फार पैसे दिले. नाईलाजाने उधार धान्य विक्री करावे लागल्याचे बोलून दाखविले.
यावेळी काही व्यापाºयांनी सचिव रमेश चौधरी यांनी शेतकºयांचा माल खरेदीसाठी लॉकडाऊनचे कारण पुढे करीत मार्केट बंद ठेवले आहे. सचिवांच्या तोंडी सूचनेने आम्ही काही व्यापाºयांनी शेतकºयांचा गहू, ज्वारी, बाजरी खरेदी केले आहे. पण हा खरेदी केलेला माल विक्रीसाठी आम्ही गुजराथला पाठवितो. व्यापारी म्हणून आम्ही माल खरेदी केला आहे, असे परवाना पत्र सचिवांकडे मागणी आम्ही व्यापाºयांनी केली. त्यांनी ते पत्र देण्यास नकार दिला. तहसीलदारांना परवाना पत्र मागणी केली. पण त्यांनीही सचिवांना तसे पत्र देण्याचा अधिकार देण्यात आले असल्याचे सांगितले. पण सचिव चौधरी हे व्यापाºयांना विनाकारण त्रास देत आहेत. अनेक वेळा परवाना पत्र मागूनसुद्धा त्यांनी पत्र दिले नाही. आमच्या मालाने भरलेल्या गाड्या दोन दिवस पडून होत्या. शेवटी अमळनेर तहसिलदारांंनी आम्हाला परवाना पत्र दिले. मग आमच्या माल भरलेल्या गाड्या विक्रीसाठी गुजराथ गेल्या असल्याचे एका व्यापाºयाने नाव न छापण्याच्या अटीवर माहिती दिली .
त्यानंतर एक मापडी भेटला. त्यांनीही सचिव रमेश चौधरी यांनी शेतकºयांच्या आलेल्या मालाचे माप न करण्याच्या सूचना दिल्या आहेत म्हणून रिकाम्या हाताने बसलो आहे, तर व्यापाºयांनी शेतकºयांकडून विक्रीसाठी आलेले धान्य मोजणी व तोलाई व भरण्यासाठी फक्त दोनच हमाल मदत करतील, अशी सूचना सचिव यांनी दिली आहे.
या वेळी हमालांनी आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. कसे तरी हमाली करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. शेतकºयाचे एखादे ट्रॅक्टर आले, की दोनच हमाल संपूर्ण माल कसा मोजतील आणि भरतील? सचिव चौधरी यांच्या आडमुठ्या धोरणाला आम्ही कंटाळलो असल्याच्या भावना हमाल वर्गाने बोलून दाखविल्या .
याबाबत सचिव रमेश चौधरी यांच्याकडून माहिती जाणून घेतली असता त्यांनी सांगितले की, मार्केट चालू करावे का याबाबत तहसिलदारांना पत्रव्यवहार केला आहे. त्यांच्या उत्तराची वाट पाहत आहोत, अशी माहिती दिली.
तहसीलदार अनिल गवांदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सचिवांना नियमानुसार खरेदी सुरू करा. जास्त गर्दी होणार नाही, शेतकºयांचे हाल होणार नाही याची काळजी घ्या, अशा सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले. आता या लपाछपीत शेतकºयांचा माल खरेदीसाठी कृउबा मार्केट केव्हा सुरू होते, याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
 

Web Title: Lack of measures for purchase of farm goods in Parola Market Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.