अडावद येथे शॉर्ट सर्कीटमुळे घराला लागलेल्या आगीत हजारोचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 06:00 PM2017-11-09T18:00:47+5:302017-11-09T18:07:06+5:30

केजीएननगरातील एका घराला अचानक आग लागून लाखाचे नुकसान झाले. दि. 9 रोजी दुपारी 2-30 वाजेच्या सुमारास ही आग लागली. चोपडा येथील अग्निशमन दलाचा बंबाने आग आटोक्यात आणली.

Lack of thousands of burns in the house due to short circuit in Adawad | अडावद येथे शॉर्ट सर्कीटमुळे घराला लागलेल्या आगीत हजारोचे नुकसान

अडावद येथे शॉर्ट सर्कीटमुळे घराला लागलेल्या आगीत हजारोचे नुकसान

Next
ठळक मुद्देचोपडा पालिकेच्या अगिAशमन दलाने विझवली आगजिवितहानी नाही मात्र संसारोपयोगी वस्तू जळाल्या.

लोकमत ऑनलाईन

अडावद ता.चोपडा, दि.9 - येथील केजीएननगरातील एका घराला अचानक आग लागून लाखाचे नुकसान झाले. दि. 9 रोजी दुपारी 2-30 वाजेच्या सुमारास ही आग लागली. चोपडा येथील अग्निशमन दलाचा बंबाने आग आटोक्यात आणली. सुदैवाने कुठलीही जिवितहानी झाली नाही.

यावल-चोपडा रस्त्यावरील केजीएन नगरातील रहिवासी अब्दुल गफ्फुर पिंजारी यांच्या घराला गुरूवारी दुपारी अचानक आग लागली. घरातून धुराचे लोळ निघू लागल्याने परिसरात एकच धावपळ उडाली. आग विझविण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य जहांगीर पठाण, मेहरबान तडवी, इम्रान बेग, शकील शहा, कालू मिस्तरी, इकबाल खाटीक, फारुक पिंजारी, जहांगीर तडवी आदींनी प्रय} केले. परंतु आगीने रौद्ररुप धारण केल्याने आग आटोक्यात येत नव्हती. अखेर चोपडा नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या बंबास पाचारण करण्यात आले. अवघ्या 15 मिनिटात बंब दाखल झाला. अगAीशमन दलाच्या कर्मचा:यांनी तात्काळ आग आटोक्यात आणली. मात्र तोपयर्ंत घरातील टिव्ही, फ्रिज, कपाट, अन्नधान्यासह आदी संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. यामुळे पिंजारी यांचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. शार्ट सर्कीटमुळे आग लागल्याचे पिंजारी कुटुंबाचे म्हणणे आहे.

Web Title: Lack of thousands of burns in the house due to short circuit in Adawad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireHomeआगघर